आता वयस्करसुध्दा तरूण होतील

मुंबई- बोटॉक्सचा जोश काही वेगळाच, कमरेची लचक हळूवार आणि चेहरा आकर्षक. हे वर्णन मुंबईतल्या दांडियातील तरूणीचे नाही तर हे वर्णन ३५ पार केलेल्या यौवनेचे आहे. ही किमया साधली आहे, बोटॉक्स थेरपीने. नवरात्रीच्या आधी हे एक  इंजेक्शन युवतींसाठी उत्साहाचा खजिना घेवून येते. नवरात्रीच्या ९ रात्री उत्साहात तरूणाई रंगून जातेच, पण आता चाळीशीकडे झुकत चाललेल्या पिढीचा नवा वर्ग तयार होतोय. त्यामुळे नवरात्रीत बोटॉक्स थेरपीचा खप वाढत चालला आहे. चेहर्‍यावरील सुरकु त्या नाहीशा करण्यासाठी, अधिक तरूण दिसण्यासाठी आणि दांडीया खेळताना उत्साही वाटण्यासाठी थोडक्यात गरब्यात आकर्षणाचे केंद्र बनावे, यासाठी हा उपाय शोधून काढण्यात आला आहे. साधारणपणे पस्तिशीत असलेल्या पिढीला काही वेळा शारिरीक थकव्याने आणि  ३५ नंतर चेहर्‍यावर सुरकुत्यामुळे दांडीया खेळण्यात उत्साह वाटेनासा होतो.
अशावेळी मनात न्यूनगंडाची भावना तयार होते. अशावेळी ब्युटी क्लिनीक्सने हा सोपा मार्ग दाखवला आहे. प्रसिध्द ब्युटी कन्सल्टंटच्या म्हणण्यानुसार यंदा बोटॉक्स टोचून घेणार्‍या महिलांच्या संख्येत वाढ झाली आहे. आपण तरूण आहोत, आकर्षक आहोत आणि त्यापेक्षाही आपण छान नाचू शकतो, हा फिल येण्यासाठी केवळ ५ ते ८ हजार मोजावे लागेल. नटूनथटून गरब्याला जाण्याच्या अगोदर २ ते ३ तास आधी बोटॉक्स घेतले जाते. त्याचा परिणाम कमीतकमी ३ ते ४  महिने टिकतो. चेहर्‍याच्या नसा उत्तेजीत करणार्‍या या थेरपीचे दुष्परिणामही आहेत. सतत हे इंजेक्शन  घेतल्याने कातडी सैल पडले. मात्र तरूण दिसण्याच्या उन्मादात या मंडळींना परिणामांची फिकीर नसते.

1 thought on “आता वयस्करसुध्दा तरूण होतील”

Leave a Comment