फुलांच्या अर्कापासून बनविली औषध पध्दती

flower

मुंबई – मोठ्या महानगरांमध्ये माणूस भीती, काळजी आणि तिरस्कार यासारख्या नकारात्मक भावनांचा शिकार बनतो. होमिओपॅथीमधील वाख फुलांच्या औषधींद्वारे धार्मिक जीवन मिळविता येईल, असे ओअॅसिस होमिओपॅथीच्या डॉ. विजया पाटील यांनी सांगितले. होमिओपॅथीद्वारे कामाची चिता, व्यासपीठाची भीती, आत्मविश्वासाचा अभाव आणि न्यूनगंड यासारखे विकार बरे करता येतात.

जगभरातील असंख्य लोक आरोग्यदायी जीवनशैली प्राप्त करण्यासाठी आयुर्वेद, होमिओपॅथी आणि सोप्या योग पध्दतीचा अवलंब करीत आहेत, असे सांगून डॉ. पाटील पुढे म्हणाल्या की, फुलांच्या अर्कापासून बनविलेली औषध पध्दती विकसीत झालेली असून मानसिक आणि भावनिक बिघाडांवरील उपायांसाठी ती प्रसिध्द आहे. यातील काही तत्वे होमिओपॅथीपेक्षा वेगळी असली तरी बाख फुलांच्या औषधी या होमिओपॅथीप्रमाणेच बनविल्या जातात. ही औषधे वेगवेगळ्या शक्तीची असतात. या उलट होमिओपॅथीमध्ये औषधे वेगवेगळ्या अधिक शक्तीची असतात. बाख फुलांच्या औषधीद्वारे सर्व वयोगटातील लोकांच्या नकारात्मक भावनांवर उपाय करुन त्यांना बरे करता येते. भावनिक स्थिती बरी करण्यासाठी ३८ फुलांची ही औषधी खूप मदत करु शकते, असा दावा डॉ. पाटील यांनी केला.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही