या कारणामुळे 6 महिने जुने ट्विटर अकाउंट होणार बंद

मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरने सहा महिने जुने ट्विटर अकाउंट बंद करणार असल्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे प्लॅटफॉर्मवरील स्पेस रिकामी होईल.

ज्या युजर्सनी 6 महिन्यांपासून ट्विटर अकाउंट लॉग इन केलेले नाही, अशांना कंपनीने ई-मेल पाठवले आहेत. युजर्सला साइन अप करण्यासाठी 11 डिसेंबरपर्यंतचा वेळ देण्यात आलेला आहे. मात्र कंपनीने अद्याप स्पष्ट केलेले नाही की, कधीपर्यंत हे अकाउंट डिलीट केले जातील.

ट्विटरच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, आम्हाला युजर्सला चांगली सेवा द्यायची आहे. त्यामुळे आम्ही 6 महिने जुने अकाउंट फ्लॅटफॉर्मवरून डिलीट करणार आहोत. त्यामुळे अन्य युजर्सला योग्य माहिती मिळेल. आम्ही युजर्सला या प्लॅटफॉर्मवर एक्टिव राहण्यासाठी प्रेरित करत आहोत.

2013 मध्ये देखील ट्विटरने 12 महिन्यांपासून लॉग इन न केलेले लाखो अकाउंट्स डिलीट केले होते.

Leave a Comment