अजित पवारांच्या बाबत योग्य वेळी बोलेन – फडणवीस


मुंबई – उपमुख्यमंत्रिपदाचा मंगळवारी अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्यापाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यासर्व घडामोडींनंतर महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अजित पवारांचा पाठिंबा का स्वीकारला? असे विचारले असता, त्यावर मी योग्य वेळी बोलेन, असे फडणवीस यांनी म्हटले केले आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार महिन्याभराच्या सत्तानाट्यानंतर अखेर काही दिवसांपूर्वी राज्यात स्थापन झाले. नवे सरकार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्याने स्थापन झाले. पण, हे सरकार अवघ्या काही तासातच कोसळल्यामुळे आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

Leave a Comment