या आयएएस अधिकाऱ्याची 27 वर्षात 53वी बदली

हरियाणा कॅडरचे वरिष्ठ आयएएस अधिकारी अशोक खेमका यांची 53 व्यांदा बदली करण्यात आली आहे. 1991 चे वरिष्ठ अधिकारी अशोक खेमका यांना संग्रहण, पुरातत्व आणि संग्रहालय विभागाचे प्रधान सचिव बनविण्यात आले आहे. याआधी यावर्षी मार्च महिन्यातच त्यांची विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या प्रधान सचिव पदी नियुक्ती करण्यात आली होती.

जवळपास 27 वर्षांच्या करिअरमध्ये अशोक खेमका यांची 53 व्यांदा बदली आहे. आपल्या बदलीबाबत ट्विट करत त्यांनी भावना व्यक्त केल्या. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, पुन्हा एकदा बदली, पुन्हा परत तेथेच. काल संविधान दिन साजरा करण्यात आला. आज सर्वोच्च न्यायालयाच्या आदेश आणि नियमांना पुन्हा एकदा तोडण्यात आले. काही आनंदी असतील. अखेर ठिकाण्यावर जे लागलो. ईमानदारीचे बक्षीस अपमान.

अशोक खेमका हे 1991 बॅचचे हरियाणा कॅडेरचे आयएएस अधिकारी आहेत. गुरूग्राम येथे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांच्या जमीन व्यवहार प्रकरणी तपासामुळे ते चर्चेत आले होते. असे म्हटले जाते की, अशोक खेमका जेथेही जातात, त्या विभागाचे घोटाळे बाहेर काढतात. यामुळेच त्यांना वारंवार बदलीचा सामना करावा लागतो.

भूपिंदर सिंह हुड्डा यांच्या कार्यकाळात देखील त्यांनी अनेक घोटाळे बाहेर काढले होते. अशोक खेमका यांचा जन्म पश्चिम बंगालमध्ये झालेला आहे. त्यांनी आयआटी खडगपूर मधून 1988 मध्ये बीटेक त्यानंतर कॉम्प्यूटर सायन्समध्ये पीएचडी आणि एमबीए देखील केलेले आहे.

 

Leave a Comment