फेसबुकविरुद्ध हेरगिरी करणाऱ्या एनएसओ ग्रुपच्या कर्मचाऱ्यांची तक्रार

पेगासस स्पायवेअरद्वारे व्हॉट्सअ‍ॅप हॅक करून जगभरातील 1400 लोकांची हेरगिरी करणाऱ्या इस्त्रालयच्या एनएसओ ग्रुपच्या 8 कर्मचाऱ्यांनी आता थेट फेसबूक विरोधात तक्रार दाखल केली आहे. या कर्मचाऱ्यांनी त्यांचे फेसबूक आणि इंस्टाग्राम अकाउंट अनब्लॉक करण्याची मागणी केली आहे. तक्रारदारांनी तेल अवीव येथील जिल्हा न्यायालयात फेसबूक विरोधात तक्रार दाखल केली असून, अकाउंट अनब्लॉक करण्याची मागणी केली आहे.

त्यांनी आरोप केला आहे की, फेसबुकने मनमानी कारभार करत आणि त्यांना सूचना न देता त्यांचे अकाउंट ब्लॉक केले असून, हे त्यांच्या कराराचे उल्लंघन आहे.

फेसबुकने यावर म्हटले आहे की, एनएसओ ग्रुप आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना सायबर हल्ल्यासाठी जबाबदार धरण्यात आले असून, त्यांचे अकाउंट बंद करण्यात आले आहेत.

जगभरातील 1400 लोकांची हेरगिरी केल्याने ऑक्टोंबरमध्ये फेसबुकने एनएसओ ग्रुपविरोधात तक्रार दाखल केली आहे.

 

 

Leave a Comment