सौ. फडणवीसांनी ट्विटरवर कविता पोस्ट करत व्यक्त केल्या भावना


मुंबई – अल्पमतामुळे दुसऱ्या कार्यकाळात केवळ 3 दिवसांचे मुख्यमंत्री ठरलेल्या देवेंद्र फडणवीस यांना राजीनामा द्यावा लागला. त्यांचे निवडणुकीच्या धामधुमीतील ‘मी पुन्हा येईन’ घोषवाक्य खूप गाजले. निकालानंतर त्यांनी पहिल्यांदा सत्ता स्थापनेचा दावा करणार नसल्याची घोषणा केली, तेव्हा याच वाक्यावरून त्यांना सोशल मीडियात ट्रोल देखील करण्यात आले.


23 नोव्हेंबरला त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तेव्हा ‘मी पुन्हा आलो’ या वाक्यासह भाजप आणि फडणवीस समर्थकांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करताना ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिले. आता 3 दिवसांचे सरकार स्थापन करणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी याच वाक्यावरून चक्क कविताच सादर केली.

एक हिंदीतील कविता अमृता फडणवीस यांनी ट्विट केली. त्याचबरोबर आपल्या भावना देखील व्यक्त केल्या. पाच वर्षे मला वहिनी म्हणून आठवणी दिल्याबद्दल महाराष्ट्राचे धन्यवाद… या आठवणी सदैव माझ्या स्मरणात राहतील. या दरम्यान माझ्याने होईल तितके चांगले करण्याचा आणि सकारात्मक घडवण्याचा प्रयत्न केल्याचे त्या म्हणाल्या.

Leave a Comment