चादरींचा मऊपणा टिकवा….


गादीवर मऊसूत चादर असेल तर झोपतानाही नक्कीच आरामशीर वाटते. थकवा पळून जातो. गादीवर घालण्याच्या चादरी सुती कापडाच्या असतात, त्यामुळे जेव्हा त्या साबण पावडर घालून धुतो तेव्हा त्यातील रसायनांमुळे कालांतराने चादरींचा मऊपणा नष्ट होऊ लागतो. गादीवर घालायच्या चादरी काही काळानंतर कडक होतात किंवा त्यांचा मऊपणा कमी होऊ लागतो. चांगल्या असूनही कडकपणामुळे त्या वापराव्याशा वाटत नाहीत. अनेकदा धुतल्यानंतरही चादरींचा कडकपणा कमी होत नाही. काही युक्‍त्या केल्यास सुती चादरी मऊ राहू शकतात.

बेकिंग सोडा – नव्या चादरी वापरण्यापूर्वी त्या अर्धी बादली पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा मिसळून त्यात भिजवून ठेवा. काही वेळाने कोमट पाण्यात साबण न लावता धुवा. त्यामुळे चादरी मऊ होतात.

व्हिनेगर – थंड पाण्यात एक चमचा व्हिनेगर टाकून त्यात चादर भिजवून ठेवावी. ही चादर पाण्यातून काढून उन्हात सुकवावी. असे केल्यास फरक दिसून येईल.

साबण पावडर – वरील प्रकारे नव्या चादरी धुऊन वाळल्यानंतर त्या पुन्हा एकदा साबण पावडरमध्ये भिजत घालाव्यात आणि धुवाव्यात. मग उन्हात न वाळवता त्या मशिनमध्ये धुऊन वाळवाव्यात. जेणेकरून नव्या चादरी मऊ मुलायम होतील.

Leave a Comment