फडणवीसांसह हे नेते देखील होते अंशकालीन मुख्यमंत्री

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळे वळण आले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा पाठिंबा घेऊन 23 नोव्हेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र साडे तीन दिवसातच देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. फडणवीस यांच्या नावावर महाराष्ट्राचे सर्वात कमी दिवसाचे मुख्यमंत्री हा विक्रम झाला आहे.

मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या आधी देखील अनेक राज्यातील मुख्यमंत्री अगदी काही तासांसाठी मुख्यमंत्री झालेले आहेत. त्या मुख्यमंत्र्यांबद्दल जाणून घेऊया.

(Source)

जगदंबिका पाल – तीन दिवस

1998 ला उत्तर प्रदेशमध्ये अशाच प्रकारे राजकीय ड्रामा पाहण्यास मिळाला होता. राज्यपाल रोमेश भंडारी यांनी कल्याण सिंह यांचे सरकार बर्खास्त करून जगदंबिका पाल यांना 21 फेब्रुवारीला मुख्यमंत्री केले. मात्र न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर 23 फेब्रुवारीला त्यांना राजीनामा द्यावा लागला.

(Source)

बीएस येडियुरप्पा – 3 दिवस आणि 8 दिवस

मागील वर्षा कर्नाटकमधील राजकीय नाट्य संपुर्ण देशाने बघितले. बीएस येडियुरप्पा यांनी बहुमत नसताना देखील 17 मे ला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र शक्ती प्रदर्शनावेळी त्यांना 19 मे राजी राजीनामा द्यावा लागला.

या आधी देखील 2007 मध्ये ते 8 दिवसांसाठी मुख्यमंत्री राहिले होते.

(Source)

ओप प्रकाश चौटाला – 6 दिन

हरियाणाचे दिग्गज नेते ओम प्रकाश चौटाला 1990 मध्ये 12 जुलैला पुन्हा मुख्यमंत्री झाले. मात्र 17 जुलैला त्यांना राजीनामा द्यावा लागला.

(Source)

नितिश कुमार – 8 दिवस

बिहारमध्ये 20 वर्षांपुर्वी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. वर्ष 2000 मध्ये बहुमत सिद्ध करण्याच्या आधीच नितिश कुमार यांनी राजीनामा दिला होता. बहुमताला 8 आमदार कमी पडत असताना देखील त्यांनी 3 मार्चला शपथ घेतली आणि 10 मार्चला राजीनामा दिला.

(Source)

एससी मारक – 12 दिवस

1998 मध्ये मेघालयचे मुख्यमंत्री एससी मारक यांचे सरकार केवळ 12 दिवसच टिकले. 27 फेब्रुवारीला त्यांनी शपथ घेतली व 10 मार्चला राजीनामा दिला. याशिवाय झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेने यांना देखील 10 दिवसांमध्ये राजीनामा द्यावा लागला होता.

Leave a Comment