विमा कंपन्या 3 वर्षांपर्यंत कमी करू शकणार नाही वाहनांची किंमत

इंश्योरेंस रेग्युलेटरी अँन्ड डेव्हल्पमेंट ऑथरिटीने (इरडा) कार आणि दुचाकी वाहनांसह सर्वच वाहनांवरील विमा राशी ठरविण्यासाठी वाहनांच्या वयाच्या नियमांमध्ये बदल करण्याचा मसूदा तयार केला आहे. या अंतर्गत विमा कंपन्या 3 वर्षांपर्यंत वाहनांची किंमत कमी केली जाणार नाही. मात्र या बदलांमुळे विमा हप्ता महागणार देखील आहे.

इरडाने प्रोडक्ट फॉर मोटर ऑन डॅमेज कव्हर निश्चित करण्यासाठी एक कार्यकारी समिती बनवली होती. समितीने विमा राशी मोजण्यासाठी दोन पर्याय सुचवले होते, त्यावर इरडाने मसुदा तयार केला आहे. समितीच्या पहिल्या पर्यायानुसार कार अथवा अन्य वाहनांवर तीन वर्षांपर्यंत कंपन्या समान विमा रक्कम देईल. ही रक्कम कारच्या पहिल्या दिवशीच्या ऑन रोड किंमतीच्या बरोबर असेल. यामध्ये इनवॉयस वॅल्यू, रोड टॅक्स व नोंदणी शुल्क आणि गाडीत लावलेल्या एक्सेसरीजचा समावेश आहे.

3 वर्ष ते 7 वर्ष जुन्या वाहनांच्या किंमतीत 40 ते 60 टक्के घट केली जावू शकते. त्यानंतर कंपनी विम्याची रक्कम ठरवेल. दुसऱ्या विकल्पानुसार, सुरूवातीच्या 6 महिन्यात कारची किंमत त्याच्या मॉडेलच्या किंमतीच्या 95 टक्के ग्राह्य धरली जाईल. त्यानंतर 7 वर्षांपर्यंत कारचे मुल्य 40 टक्क्यांपर्यंत कमी केले जावू शकते.

इरडाने म्हटले आहे की, पुर्ण नुकसान अथवा कार चोरी झाल्यास कंपनीला पुर्ण विमा रक्कम द्यावी लागेल. कमर्शियल वाहनांमध्ये इनवॉयस वॅल्यूसोबतच बॉडी, एक्सेसरीज याचा देखील समावेश आहे. विमा कंपन्या यामध्ये वार्षिक आधारावर रक्कम कमी करू शकते, जी अधिकतर 75 टक्के असू शकते. वाहनांच्या वयानुसार, विम्याची रक्कम ही कमी होत जाईल.

Leave a Comment