हॉनरचे 5 जी सपोर्ट स्मार्टफोन लाँच

स्मार्टफोन कंपनी हॉनरने 5जी सीरिजमधील व्ही30 आणि व्ही30 प्रो हे स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केले आहेत. दोन्ही फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा, जबरदस्त प्रोसेसर, दोन फ्रंट कॅमेरे देण्यात आलेले आहेत.

हॉनर व्ही30 हा स्मार्टफोन 2 व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. यामध्ये 6 जीबी रॅम + 128 जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 3,299 युआन (जवळपास 33,000 रुपये) आहे. तर 8 जीबी रॅम + 128 जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 3,699 युआन (जवळपास 37,000 रुपये) आहे.

(Source)

व्ही30 प्रो देखील 2 व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. याच्या 8 जीबी रॅम + 128 जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटची किमत 3,899 युआन (जवळपास 39,000 रुपये) असून, 8 जीबी + 256 जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 4,199 युआन (जवळपास 42,000 रुपये) आहे.

दोन्ही डिव्हाईसमध्ये जास्त फरक नाही. दोन्ही डिव्हाईसमध्ये 6.57 इंच फूल एचडी+ पंचहोल डिस्प्ले देण्यात आला असून, त्याचे रिज्युलोशन 1080 x 2400 पिक्सल आहे. यामध्ये चांगल्या परफॉर्मेंससाठी किरिन 990 चिपसेट प्रोसेसर देण्यात आले आहे. तर यात अँड्राईड 10 ऑपरेटिंग सिस्टम मिळेल.

(Source)

कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर दोन्ही फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यामध्ये 40 मेगापिक्सल प्रायमेरी कॅमेरा असून, 8+12 मेगापिक्सलचे इतर दोन कॅमेरे आहेत. सेल्फीसाठी 32 आणि 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा मिळेल.

व्ही30 मध्ये 4200 एमएएच ची बॅटरी देण्यात आली असून, व्ही30 प्रो मध्ये 4100 एमएएचची बॅटरी मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी दोन्ही डिव्हाईसमध्ये 5जी, 4जी एलटीई, वाय-फाय  ए/बी/जी/एन/एसी, ब्लूटूथ 5.1, जीपीएस/ ए-जीपीएस आणि एनएफसी सारखे फीचर्स मिळतील.

 

Leave a Comment