टेस्ला सायबर आणि फोर्ड एफ-150 ट्रकच्या लढतीत कोणी मारली बाजी

टेस्लाने काही दिवसांपुर्वीच आपला इलेक्ट्रिक सायबर ट्रक लाँच केला आहे. लाँच झाल्यापासूनच हा ट्रक चर्चेत असून, आतापर्यंत या ट्रकसाठी लाखो ऑर्डर आले आहेत. एलॉन मस्क देखील ट्विटर करून वारंवार सायबर ट्रकबद्दल सांगत आहे.

नुकताच एलॉन मस्क यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये टेस्लाचा सायबर ट्रक प्रतिस्पर्धी कंपनी फोर्डचा एफ-150 ट्रकला पॉवरच्या बाबतीत सहज मात देत असल्याचे दिसत आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सायबर ट्रेक आणि फोर्ड एफ-150 ला एकमेंकाना रोपद्वारे जोडले आहे. सायबर ट्रक सहज फोर्डला ओढत आहे.

व्हिडीओ शेअर केल्यापासून आतापर्यंत 13 मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत. अनेक युजर्सनी या व्हिडीओवर ही स्पर्धा निष्पक्ष कशी असा देखील प्रश्न विचारला.

एका युजरने ट्विट केले की, फोर्डचा ट्रक टू-व्हिल ड्राईव्ह आहे तर टेस्लाचा ट्रक फोर-व्हिल ड्राईव्ह आहे. त्यामुळे यामध्ये तुलना होऊ शकत नाही.

फोर्डचे व्हाईस प्रेसिडेंट सनी मद्रा यांनी देखील ही स्पर्धा निष्पक्ष नसल्याचे ट्विट केले. त्यांनी लिहिले की, सायबर ट्रक आमच्याकडे पाठवा मग अॅपल विरुध्द अॅपल अशी टेस्ट घेऊ.

यावर एलॉन मस्क यांनी देखील हे आव्हान स्विकारले असल्याचे ट्विट केले.

Leave a Comment