यामुळे कधीच तयार न झालेल्या ड्रेससाठी मोजले 7 लाख रुपये

जग झपाट्याने बदलत असून, यामध्ये सोशल मीडियाचे मोठे योगदान आहे. सोशल मीडियावर प्रत्येकजण स्वतःला वेगळे आणि स्टाईलिश दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. सॅन फ्रॅन्सिस्कोचे एक उद्योगपती रिचर्ड मा यांनी सोशल मीडियासाठी असाच एक 7.13 लाख रुपयांचा ड्रेस खरेदी केला आहे. मात्र तुम्हाला आश्चर्य वाटेल की, हा ड्रेस वास्तवतेमध्ये कधी तयारच झालेला नाही. ही गोष्ट रिचर्ड यांना देखील माहिती आहे, तरी देखील त्यांनी एवढी मोठी रक्कम दिली. का माहितीये ?

द फॅब्रिकेट नावाची एक डिजिटल फॅशन कंपनी आहे. ही कंपनी डिजिटल वर्ल्डसाठी कपडे बनवते. यावर दाखवण्यात आलेले कपडे खऱ्या आयुष्यात कदाचितच बघायला मिळतील. मात्र पुन्हा प्रश्न असा येतो की, जर कपडे मिळणारच नसतील तर खरेदी का करतात ? तर याचे उत्तर आहे, हे कपडे केवळ सोशल मीडियावर दाखविण्यासाठी असतात. त्यांचे तेवढेच काम आहे.

तुम्ही सोशल मीडियावर अनेक लोकांना आणि सेलिब्रेटिंना दररोज नवीन कपड्यांमध्ये फोटो टाकताना बघत असाल. मात्र दररोज नवीन कपडे हे खरच अवघड काम आहे. यासाठी ही कंपनी डिझाईनर कपड्यांची एक लिस्टिंग देते. तुम्ही कपडे  व्हर्च्युअल जगात खरेदी करतात. कंपनी तुमच्या फोटो अथवा व्हिडीओवर कपडे अशाप्रकारे फीट करते, की जसे तुम्ही ते कपडे घातलेले आहेत.

सोशल मीडियावर लोकप्रिय होण्यासाठी लोक कपडे खरेदी करतात, एकदा परिधान करतात आणि सोडून देतात.

जारापासून ते फॅशन ब्रँड कार्लिंग्सने देखील डिजिटल कलेक्शन लाँच केले आहे. या कपड्यांची किंमत 11 डॉलरपासून सुरू आहे. खास गोष्ट म्हणजे जे पैसे तुम्ही खर्च करता ते केवळ एक फोटो अथवा व्हिडीओसाठी असतात. जर एका कपड्याला तुम्हाला पुन्हा घालायचे असेल तर परत पैसे खर्च करावे लागतात.

विशेषज्ञांच्या मते, डिजिटल क्लोथिंग बाजारात वाढत आहे. येणाऱ्या काळात याची मागणी अजून वाढेल. यंग जनरेशन दररोज नवीन आणि हटके दिसण्यासाठी पैसे खर्च करत आहे.

Leave a Comment