82 वर्षीय आजीबाईंनी घुसखोराला शिकवला धडा, नेटकऱ्यांनी केले धाडसाचे कौतूक

सर्वसाधारणपणे घरात वृद्ध महिलाबघून चोर चोरी करण्याचा प्रयत्न करतात. मात्र न्युयॉर्कमध्ये एका वृद्ध महिलेच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या घुसखोराला हे चांगलेच महागात पडले.

बॉडी बिल्डर असलेल्या 82 वर्षीय आजीबाईंच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या घुसखोराला चांगलाच मार बसला. बॉडी बिल्डर असलेल्या विली मर्फी नावाच्या आजीबाई रात्री झोपायला जात असतानाच, एक व्यक्ती त्यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत होता. तो मर्फी यांना सांगत होता की, त्याला रुग्णवाहिका हवी आहे. मात्र मर्फी यांनी दरवाजा न उघडता पोलिसांना फोन केला.

दरवाजा न उघडल्यामुळे घुसखोर दरवाजा तोडून आत शिरण्याचा प्रयत्न करत होता. घरात घुसलेल्या घुसखोराला बॉडी बिल्डर आजीबाईंनी टेबल आणि झाडूने चांगलाच चोप दिला. अखेर पोलिस घटनास्थळी दाखल झाले व त्या घुसखोराला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पोलिसांनी ट्विट करत या घटनेची माहिती दिली.

नेटकऱ्यांनी देखील विली मर्फी यांच्या धाडसाचे कौतूक केले. मर्फी या बॉडी बिल्डर असून, त्या दररोज व्यायाम करतात. 2014 मध्ये त्यांना ‘वर्ल्ड नॅचरल पॉवरलिफ्टिंग फेडरेशन लिफ्टर ऑफ द एअर’चा पुरस्करा देखील मिळालेला आहे.

 

Leave a Comment