विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी आम्ही तयार


मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्रामधील सत्तासंघर्षावर महत्वपूर्ण निर्णय दिला असून न्यायालयाने राज्यामधील घोडेबाजार थांबवण्यासाठी लवकरात लवकर बहुमत चाचणी घेणे गरजेचे असल्याचे सांगत उद्या बहुमत चाचणी घेण्यास सांगितले आहे. आमदारांचा शपथविधी उद्या पाच वाजेपर्यंत पूर्ण करण्यात यावा असेही न्यायालयाने म्हटले आहे. त्याचबरोबर विश्वासदर्शक ठरावाचे थेट प्रेक्षपण करण्यात यावे असे निर्देश देखील न्यायालयाने दिले आहेत. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी आम्ही तयार असून, आम्ही उद्या विधानसभेत बहुमत सिद्ध करुन दाखवू असा विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आपण आदर करत असल्याचेही सांगितले आहे.

न्यायाधीशांनी निकाल देतेवेळी लोकशाही मूल्यांचे रक्षण होणे आवश्यक असून चांगले सरकार मिळणे हा लोकांचा मुलभूत अधिकार आहे. त्याचबरोबर न्यायालयाला घोडेबाजार रोखण्यासाठी काही आदेश देणे गरजेचे नसल्यामुळे कोणतेही गुप्त मतदान न घेता उद्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत बहुमत चाचणी घेण्याचा आदेश आम्ही देत असल्याचे स्पष्ट केले. बहुमतासाठी घेण्यात येणारे मतदान हे गुप्त पद्धतीने न घेता ते थेट घेण्यात यावे तसेच या मतदानाचे थेट प्रेक्षपण करण्यात यावे असेही न्यायालयाने आज स्पष्ट केले आहे. न्यायालयाने संबंधित निकाल देताना बहुमत चाचणीसाठी हंगामी व स्थायी अध्यक्षांची नेमणूक करून आमदारांना शपथ देण्याचे आदेश दिले आहेत.

Leave a Comment