ही आहे जगातील सर्वात महागडी एसयूव्ही, जाणून घ्या वैशिष्ट्य

महागड्या लग्झरी एसयूव्ही गाड्यांमध्ये रॉल्स रॉयल कलीनन, बेंतले बेंताग्या, लॅबोर्गिनी उरूस यांचा समावेश होतो. या गाड्यांची किंमत कोटींमध्ये आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का जगातील सर्वात महागडी एसयूव्ही कोणती आहे ?

(Source)

जगताली सर्वात महागड्या एसयूव्हीचे नाव Karlmann King SUV असे आहे. या एसयूव्हीची एक्स शोरूम किंमत 10 लाख डॉलर म्हणजेच जवळपास 7 कोटी रुपये आहे. याचे सर्वात खास वैशिष्ट्य या एसयूव्हीचे डिझाईन आहे. ट्रांसफॉर्म्स चित्रपटाद्वारे प्रेरणा घेऊन बनविण्यात आलेली ही एसयूव्ही बाहेरून डायमंडप्रमाणे दिसते. यामध्ये एका बाजूला 2 दरवाजे आहेत, तर दुसऱ्या बाजूला एकच दरवाजा आहे.

ही एसयूव्ही दिसायला स्टिल्थ फाइटर जेटप्रमाणेच वाटते. याचा रंग देखील मॅट ब्लॅक आहे. ही फोर्ड एफ 550 चेसिसवर बनली आहे.

(Source)

Karlmann King एसयूव्हीला सहज कस्टमाइज्ड केले जावू शकते. याच्या इंटेरियर आणि एक्सटिरियरमध्ये बदल केले जावू शकतात. गरज पडल्यास या एसयूव्हीला बुलेटप्रुफ देखील बनवता येते. मात्र यासाठी अतिरिक्त किंमत द्यावी लागते.

(Source)

या महागड्या एसयूव्हीमध्ये 6.8 लीटरचे व्ही10 इंजिन आहे. जे 420 एचपीची पॉवर देते. या एसयूव्हीचा टॉप स्पीड ताशी 220 किमी आहे. जर एखाद्याने भारतात ही एसयूव्ही खरेदी केली तर टॅक्स आणि ड्यूटी मिळून याची किंमत 15 कोटी रुपयांपर्यंत जाते.

Leave a Comment