ह्युवाईच्या मेटबूक सीरिजमधील शानदार लॅपटॉप लाँच, जाणून घ्या फीचर्स

ह्युवाईने चीनमध्ये झालेल्या एका इव्हेंटमध्ये मेटबूक सिरिजमधील दोन लॅपटॉप लाँच केले आहेत. कंपनीने मेटबूक डी 15 आणि मेटबूक डी 14 हे दहाव्या जनरेशन इंटेल प्रोसेसर असणारे लॅपटॉप लाँच केले आहेत. याशिवाय एएमडीच्या 12एनएम Ryzen R5 3500U प्रोसेसरसोबत Radeon Vega 8 ग्राफिक्स पर्यायामध्ये देखील लॅपटॉप लाँच करण्यात आले आहेत. या लॅपटॉपमध्ये पॉवर बटनसोबतच फिंगरप्रिंट सेंन्सर देखील देण्यात आला आहे.

किंमतीविषयी सांगायचे तर मेटबूक डी 15 च्या सुरूवाती व्हेरिएंटची किंमत 3999 युआन (जवळपास 40 हजार रुपये) आहे. तर सर्वात टॉप इंटेल पॉवर्ड व्हेरिएंटची किंमत 6599 युआन (जवळपास 66 हजार रुपये) आहे. मेटबूक डी 14 लॅपटॉपच्या सुरूवाती व्हेरिएंटची 3999 युआन (जवळपास 40 हजार रुपये) आहे व टॉप व्हेरिएंटची किंमत 6499 युआन (जवळपास 65 हजार रुपये) आहे. चीनमध्ये या लॅपटॉपचे प्री-ऑर्डर सुरू झाले असून, 3 डिसेंबरपासून विक्री करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात हा लॅपटॉप कधी दाखल होणार या बाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.

(Source)

मेटबूक डी 15 आणि मेटबूक डी 14 हे दोन्ही लॅपटॉप डिझाईन आणि इंटर्नल स्पेसिफिकेशनमध्ये एकसारखेच आहेत. मेटबूक डी 15 मध्ये 15.6 इंच फूल एचडी (1920 x 1080 पिक्सल) डिस्प्ले देण्यात आला आहे. तर मेटबूक डी 14 मध्ये 14 इंच फूल एचडी (1920 x 1080 पिक्सल)  डिस्प्ले मिळेल.

(Source)

मेटबूक डू 15 मध्ये दहाव्या जनरेशन इंटेल कोर  i7-10510 प्रोसेसरसोबत 16 जीबी रॅम आणि  Nvidia GeForce MX250 ग्राफिक्स देण्यात आले आहे. तर रायझन एडिशन लॅपटॉपमध्ये AMD Ryzen R5 3500U प्रोसेसरसोबत 16 जीबी रॅम मिळेल. तर स्टोरेजमध्ये 1 टीबी हार्ड डिस्कसोबत 256 जीबी एएसडी मिळेल. मेटबूक डी 14 मध्ये डी15 प्रमाणेच प्रोसेसर आणि रॅम आहे. मात्र स्टोरेज पर्यायामध्ये केवळ 512 एएसडी स्टोरेज मिळेल.

मेटबूक डी 15 मध्ये 42Wh बॅटरी देण्यात आली आहे. तर मेटबूक डी 14 मध्ये 56Whr बॅटरी मिळेल. दोन्ही लॅपटॉपमध्ये ड्यूल 2W स्पीकर आणि 720पी वेबकॅम देण्यात आले आहे. याशिवाय कनेक्टिव्हिटीसाठी यात यूएसबी 3.0 टाइप-ए पोर्ट, यूएसबी 2.0 टाइप ए पोर्ट, यूएसबी सी-टाइप पोर्ट, एचडीएमआय पोर्ट आणि 3.5एमएम हेडफोन जॅकसारखे फीचर्स मिळतील. हे दोन्ही लॅपटॉप सिल्वर मून आणि गडद ग्रे रंगात उपलब्ध आहेत.

Leave a Comment