संविधान दिवस : या देशांपासून प्रेरित आहे आपले संविधान

26 नोव्हेंबर 1949 ला घटना समितीने भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला तर 26 जानेवारी 1950 ला त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. त्यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो.

भारताचे संविधान हे संपुर्ण जगात खास मानले जाते. मात्र भारतीय संविधान हे इतर देशांपासून प्रेरित आहे. आपल्या संवैधानिक व्यवस्था आणि संस्थांवर ब्रिटिश संविधानाचा सर्वाधिक परिणाम दिसून येतो. याशिवाय आयर्लंड, दक्षिण आफ्रिका आणि जर्मनीसह अन्य देशांच्या संविधानातील काही प्रावधानांना स्थान देण्यात आलेले आहे. जाणून घेऊया कोणत्या देशाच्या संविधानातील खास गोष्टींना आपल्या देशातील संविधानात स्थान देण्यात आलेले आहे.

  • ब्रिटन – संसदीय व्यवस्था, कायद्याचे शासन, एकल नागरिकता आणि न्यायिक याचिका
  • अमेरिका – मूळ अधिकार, न्यायपालिका, देशाचे राष्ट्रपती आणि न्यायधीशांविरुद्ध महाभियोगाचे प्रावधान
  • आयर्लंड – राज्याचे निति निर्देशक तत्व
  • कॅनडा – संघीय स्वरूप यासोबतच मजबूत केंद्र
  • फ्रान्स – स्वातंत्रता, समानता आणि बंधुत्व
  • ऑस्ट्रेलिया – देशभरात व्यापार आणि व्यावसायिक कार्यास स्वातंत्र्य
  • दक्षिण आफ्रिका – संविधानात संशोधन
  • जर्मनी – आणीबाणीच्या काळात मूळ अधिकार निलंबित ठेवण्याचे प्रावधान

Leave a Comment