सातवीत शिकणारा विद्यार्थी सॉफ्टवेअर कंपनीत करतो चक्क डेटा सायंटिस्टची नोकरी

हैदराबादच्या एका सॉफ्टवेअर कंपनीने चक्क 12 वर्षांच्या मुलाला डेटा सायंटिस्ट म्हणून कामाला ठेवले आहे. 12 वर्षीय सिद्धार्थ श्रीवास्तव पिल्ली हा सातवीच्या वर्गात शिकतो. त्याला हैदराबादची सॉफ्टवेअर कंपनी मॉन्टेक स्मार्ट बिझनेस सॉल्यूशन्सने डेटा सायंटिस्ट या पदासाठी नोकरी दिली आहे.

सिद्धार्थने सांगितले की, मी श्री चैतन्य टेक्नो स्कूलमध्ये 7वीत शिकत आहे. या सॉफ्टवेअर कंपनीत काम करण्यासाठी माझी प्रेरणा तन्मय बक्षी आहेत. त्यांनी खूप लहान वयातच गुगलमध्ये काम करण्यास सुरूवात केली होती व ते जगाला समजवण्याचा प्रयत्न करत आहे की, आर्टिफिशियल इंटेलिजेंस क्रांती किती सुंदर आहे.

सिद्धार्थ पुढे म्हणाला की, मी माझ्या वडिलांचे आभार मानतो की त्यांनी मला खूप कमी वयातच कोडिंग करण्यास शिकवले. एवढ्या कमी वयात मला नोकरी मिळून देण्यास मदत करणारे माझे वडिल आहेत. त्यांनीच मला कोडिंग शिकवली व आज मी जे काही आहे ते त्यांच्यामुळेच आहे.

Leave a Comment