रविशंकर प्रसाद यांना मिळाला भारतात असेंबल झालेला ‘आयफोन एक्सआर’

केंद्रीय दुरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी काल आपल्या ट्विटर अकाउंटवरून अ‍ॅपलच्या आयफोन एक्सआरचे फोटो शेअर केले. या फोनच्या बॉक्सवर असेंबल्ड इन इंडिया असे लिहिलेले होते. रविशंकर प्रसाद म्हणाले की, मला आशा आहे की अ‍ॅपल येणाऱ्या काळात आपल्या सर्व डिव्हाईसचा विस्तार करेल. अ‍ॅपलची स्पलायर कंपनी चेन्नई येथील नोकियाची बंद झालेली फॅक्ट्री खरेदी करणार आहे.

नोकियाची ही फॅक्ट्री मागील 10 वर्षांपासून बंद आहे. ही फॅक्ट्री मार्च 2020 मध्ये पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. याआधी नोकियाच्या या फॅक्ट्रीमध्ये 2000 कोटींची गुंतवणूक करण्यात आली होती.

आयफोन एक्सआरचे स्पेसिफिकेशन –

हा फोन ड्युअल सिम ड्युअस स्टॅडबाय मिळेल व यात आउट ऑफ बॉक्स आयओएस 12 मिळेल. या फोनमध्ये 6.1 एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजॉल्यूशन 828×1792 पिक्सल आहे. या फोनमध्ये 3डी टच ऐवजी हॅप्टिक टच देण्यात आलेला आहे. या फोनची बॉडी 7000 सीरिज एरोस्पेस ग्रेड एल्युमिनियमपासून बनविण्यात आलेली आहे. याला वॉटर व डस्टप्रुफसाठी आयपी67 रेटिंग मिळाली आहे.

(Source)

कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यात 12 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा देण्यात आलेला आहे. तर फ्रंटला 7 मेगापिक्सल कॅमेरा मिळेल. या फोनमध्ये ड्युअल सिम सपोर्ट मिळेल, ज्यातील एक ई-सिम आहे.

कनेक्टिव्हिटीमध्ये यात लाइटेनिंग कनेक्टर मिळते. याच्या मदतीनेच हेडफोनचा वापर करावा लागेल. यात हेडफोन जॅक वेगळा देण्यात आलेला नाही. फोनमध्ये 4जी वीओएलटीई आणि ई-सिम सपोर्ट आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ब्लूटूथ 5.0 मिळते, तर वाय-फाय 802.11 देण्यात आले आहे.

(Source)

किंमतीबद्दल सांगायचे तर आयफोन एक्सआरच्या 64 जीबी व्हेरिएंटची किंमत 49,900 रुपये व 128 जीबी व्हेरिएंटची किंमत 54,900 रुपये आहे.

 

Leave a Comment