आता तुमच्या ड्रायव्हिंगवरून ठरणार कारच्या विम्याचा हप्ता

लवकरच आता तुमच्या ड्रायव्हिंगच्या पद्धतीवरून कारचे इंश्योरेंस ठरणार आहे. येणाऱ्या काळात कारच्या मॉडेलच्या आधारावर नाही तर तुम्ही गाडी कशी चालवता याच्या आधारावर इंश्योरेंसचा हप्ता ठरणार आहे. याचा अर्थ असा की, तुम्ही जर खराब ड्रायव्हिंग करत असाल तर तुम्हाला इंश्योरेंससाठी जास्त पैसे भरावे लागतील.

इंटरनेट ऑफ थिंग्समुळे (आयओटी) कंपन्यांना ड्रायव्हिंगच्या पद्धतीद्वारे इंश्योरेंस प्रिमियम ठरवण्याची सुविधा मिळेल. इंश्योरेंस कंपन्या तुमच्या कारमध्ये लागलेले सेंसर्स आणि टेलिमॅटिक्स डिव्हाईसेजच्या मदतीने अंदाज लावेल की, तुम्ही किती चांगल्या अथवा वाईट पद्धतीने कार चालवता. ड्रायव्हिंगच्या आधारावर घेण्यात येणाऱ्या इंश्योरेंसला युजेज बेस्ड इंश्योरेंस (यूबीयू) असे नाव देण्यात आले आहे.

यूबीआय ड्रायव्हिंग संबंधित पॅटर्न रेकॉर्ड करणारे टेलिमॅटिक्स डिव्हाइसेसद्वारे गोळा करण्यात आलेल्या डेटाद्वारे ठरते. यामध्ये जोरात एक्सेलरेटर दाबणे, अचानक ब्रेक लावणे, गाडीच्या बॉडीला नुकसान होणे, कॉर्नरवर फास्ट ड्रायव्हिंग, जोरात डायरेक्शन बदलणे आणि एअरबॅग्सचा वापर या गोष्टींचा ड्रायव्हिंग पॅटर्नमध्ये समावेश होतो.

टेक्नोलॉजी तंज्ञानुसार, एका हाय अँन्ड सिडान कारमध्ये कमीत कमी 70 सेंसर्स असतात. हे सेंसर क्लाउडवर सतत डेटा पाठवत असतात. इंश्योरेंस प्रिमियम ठरवण्यासाठी या डेटाचा वापर केला जाईल.

Leave a Comment