आधार कार्डचे स्टेट्स चेक करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

आधार कार्डच्या रजिस्ट्रेशननंतर त्याला बनविण्यासाठी 90 दिवसांचा वेळ जातो. या काळात अनेकजण आधारचे स्टेट्स चेक करत नाही. अनेकांना याबद्दल माहितीच नसते.

जर तुम्हाला आधार कार्डचे स्टेट्स चेक करायचे असेल, तर यासाठी तुम्ही आधार विभागाच्या अधिकृत वेबसाइट्सवर तपासू शकता. मात्र यासाठी आधार कार्ड रजिस्ट्रेशन करताना देण्यात येणारी एकनॉलेजमेंट स्लीप असणे गरजेचे आहे. याशिवाय आधार कार्ड जनरेट झाल्याचा एसएमएस तुमच्या मोबाईल नंबरवर देखील येतो. तुम्ही घरी बसल्या बसल्या देखील आधारचे स्टेट्स तपासू शकता.

(Source)

सर्वात प्रथम यूआयडीएआयची अधिकृत वेबसाइट www.uidai.gov.in वर जा.

(Source)

साइटवर गेल्यानंतर तुम्हाला माय आधार असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. त्यातील चेक आधार स्टेट्स असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

(Source)

त्यानंतर त्यात तुमचा 14 अंकी एनरोलमेंट आयडी टाका.

(Source)

येथे कॅप्चा कोड टाकून चेक स्टेट्सवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला आधार कार्डच्या स्टेट्सची माहिती मिळेल. जर तुमचे आधार कार्ड जनरेट झाले असेल, तर तुम्ही साइटवर जाऊन डाउनलोड देखील करू शकता.

Leave a Comment