भारतात लाँच झाले ‘गुगल नेस्ट’ मिनी स्मार्ट स्पीकर

गुगलने आज भारतात आपला नवीन मिनी स्मार्ट स्पीकर ‘गुगल नेस्ट’ लाँच केला आहे. गुगल नेस्ट मिनी स्मार्ट स्पीकरची भारतात किंमत 4,999 रुपये आहे. ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर याची विक्री होईल. गुगल नेस्ट दोन वर्षांपुर्वी लाँच झालेल्या गुगल होम मिनीचे अपग्रेटेड व्हर्जन आहे.

गुगल नेस्ट मिनीत होम मिनीच्या तुलनेत डिझाईनमध्ये थोडा बदल करण्यात आला आहे. याशिवाय यात हूक देखील देण्यात आले आहे. यामध्ये नवीन पॉवर कनेक्टर पोर्ट आणि केबल देखील मिळेल. बाकी डिझाईन गुगल होम मिनी प्रमाणेच आहे. या मिनी स्मार्ट स्पीकरची बॉडी फॅब्रिकची आहे.

नवीन स्मार्ट स्पीकरमध्ये शानदार साउंड आणि फास्ट परफॉर्मेंसचा दावा करण्यात आला आहे. यामध्ये मशीन लर्निंग चीप आहे. गुगल नेस्ट मिनी चॉक आणि चारकोल रंगाच्या व्हेरिएंटमध्ये मिळेल. यामध्ये युट्यूब म्यूझिक, स्पॉटीफाय, गाना, जिओ सावन आणि विंक म्यूझिक सपोर्ट करेल. गुगल होम मिनी स्पीकर आता केवळ 2,999 रुपयांना मिळत आहे. गुगल नेस्ट मिनी अमेझॉनच्या इको डॉटला टक्कर देईल.

 

Leave a Comment