पदभार स्वीकारताच फडणवीसांनी केली यावर स्वाक्षरी


मुंबई : राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांना हाताशी धरत भाजपचे विधीमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली असली, तरी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या महाविकासआघाडीने हा पेच सोडवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पण त्याचवेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात आपला पदभार स्वीकारला.


देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार पुन्हा एकदा स्वीकारताच पहिली स्वाक्षरीही केली आहे. पण आपल्यापैकी अनेकांना ही स्वाक्षरी कोणत्या कामासाठी झाली, असा प्रश्न पडला आहे. तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या धनादेशावर फडणवीसांनी स्वाक्षरी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दादरच्या श्रीमती कुसुम किरण वेंगुर्लेकर यांना एक लाख वीस हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. मुख्य सचिव अजॉय मेहताही यावेळी उपस्थित होते.

Leave a Comment