गायींचे थडींपासून संरक्षण करण्यासाठी ही महानगरपालिका घालणार स्वेटर

अयोध्या महानगरपालिकेने हिवाळ्यात गायींना थंडी वाजू नये यासाठी त्यांना स्वेटर घालण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे अयोध्येतील गायींचे अच्छे दिन आले आहेत.

अयोध्या महानगरपालिकेचे आयुक्त नीरज शुक्ला म्हणाले की, गायींसाठी कोट तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही योजना तीन-चार टप्प्यात राबवली जाईल. बैशिंगपूर येथील काऊ शेल्टरमध्ये 1200 गुरेढोरे आहेत. यात 700 बैल आहेत. यातील 100 वासरांसाठी आम्ही स्वेटरची ऑर्डर दिली आहे.

शुक्ला यांनी पुढे सांगितले की, स्वेटरची डिलिव्हरी नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत होईल. गाईच्या प्रत्येक स्वेटरची किंमत 250-300 रुपये आहे. गाई आणि बैलांच्या स्वेटरची डिझाईन वेगळी आहे. बैलाचे स्वेटर हे तागापासून बनविण्यात आले आहेत. तर गाईचे स्वेटरमध्ये दोन लेअर्स आहे.

याशिवाय गायींना थंडी वाजू नये यासाठी शेल्टर जवळ शेकोटी देखील पेटवली जाईल.  गायी जमिनीवर बसल्यास त्यांना ऊब मिळावी यासाठी जमिनीवर पेंढा टाकला जाईल.

Leave a Comment