20 मिनिटात तब्बल 350 फरश्या तोडत 8 वर्षाच्या चिमुरडीने रचला विक्रम

हैदराबादच्या 8 वर्षीय पीडीव्ही सहरुदाने शनिवारी दोन विश्वविक्रम केले आहेत. सहरूदाच्या या विक्रमाला एलीट वर्ल्ड रेकॉर्ड्स एलएलसी यूएसएने देखील मान्यता दिली आहे. सहरूदाने 20 मिनिटात 102 ऑरिगेमी मॉडेल बनवले आणि तेवढ्याच वेळेत 350 सिरेमिक टाइल्स (फरशा) तोडल्या. या आधी हा विक्रम दक्षिण कोरियाच्या एका महिला खेळाडूच्या नावावर होत्या. तिने 20 मिनिटात 262 फरशा तोडल्या होत्या.

सहरुदाने सांगितले की, मी 3 विश्व विक्रम बनविण्याचा प्रयत्न केला. मात्र 2 विक्रमच बनविण्यात यश आले. मागील 1 वर्षांपासून कराटे शिकत असून, आतापर्यंत ग्रीन बेल्ट मिळाला आहे. सिरेमिक टाइलसाठी मी ट्रेनरबरोबर 5 मिलीमीटर जाड टाइल तोडण्याची प्रॅक्टिस करत असे.

सहरुदाची ट्रेनर अश्विनी आनंदने सांगितले की, 2017 मध्ये मी डब्ल्यूकेयू वर्ल्ड चॅम्पियनमध्ये सेंकड डिग्री ब्लॅक बेल्ट मिळवला आहे. माझा उद्देश जास्तीत जास्त महिला आणि मुलींना ट्रेन करणे हा आहे. सहरूदाची आता सुरूवात आहे. सहरूदा जागतिक चॅम्पियनशीप आणि इतर स्पर्धांसाठी तयारी करत आहे.

 

Leave a Comment