11 वीच्या विद्यार्थ्याने तयार केले हायड्रोजनद्वारे दुचाकी चालवणारे किट

तामिळनाडूच्या वैल्लोर जिल्ह्यामधील एका गावातील सरकारी शाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने एक असे किट तयार केले आहे, ज्याद्वे दुचाकी वाहने हायड्रोजनद्वारे चालवली जावू शकतात. या विद्यार्थ्याने आपल्या वडिलांची दुचाकी हायड्रोजनच्या मदतीने चालवण्यात यश मिळवले आहे.

पेनाथूर गावात राहणाऱ्या या युवा वैज्ञानिकाचे नाव डी. देवेंद्रिरन आहे. तो 11 वी मध्ये शिकत आहे. देवेंद्रिरनने वैल्लोर इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये आयोजित राज्य स्तरीव विज्ञान महोत्सवात हा प्रोजेक्ट सादर केला.

यावेळी नॅशनल डिझाईन अँन्ड रिसर्च फोरमचे (एनडीआरएफ) अध्यक्ष मायलस्वामी अन्नादुराई यांनी हा प्रोजेक्ट बघून व्हीआयटी इंस्टिट्यूटसोबत मिळून एनडीआरएफ या प्रोजेक्टला पुढे नेण्यासाठी देवेंद्रिरनची मदत करणार असल्याचे सांगितले.

या प्रोजेक्टविषयी देवेंद्रिरनने सांगितले की, त्याने 10 वीमध्ये शिकणाऱ्या आपल्या बहिणीबरोबर मिळून, हे किट तयार केले. दोघेही पेनाथूर गावातील सरकारी हायर सेकेंडरी शाळेत शिकतात.

त्याने सांगितले की, दुचाकी वाहनासांठी किट बनविण्यास 2500 रुपये खर्च आला. तर 500 रुपये अधिक खर्च करून फोर स्ट्रोक दुचाकींसाठी देखील बनवता येईल. सध्या या इंधनाद्वारे वाहनाला 25 किमीपर्यंत चालवले जावू शकते. मी या डिव्हाईसची क्षमता वाढवण्यावर काम करत आहे.

या किटमध्ये मीठ मिसळलेले पाणी हायड्रोजनद्वारे वेगळे केले जाते. देवेंद्रिरनने सांगितले की, 1 लीटर पाण्यात 3 चमचे मीठ मिसळले जाते. या पाण्यातून ऑक्सिजन आणि हायड्रोजन वेगळे करण्यासाठी जिंक आणि एल्युमिनियमच्या प्लेटांसोबत ठेवले जाते.

याद्वारे इलेक्ट्रोलिसिस प्रक्रिया सुरू होते. या प्रक्रियेत पाणी इंधन टँकमध्येच राहते व हायड्रोजन वरती जमा होते. जमा झालेल्या हायड्रोजनला ट्यूबच्या माध्यमातून कार्बोरेटरमध्ये स्थानांतरित केले जाते. जे इंजिनला स्टार्ट करण्यास मदत करते.

Leave a Comment