
मुंबई – यशवंतराव चव्हाण सेंटर या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख यांनी माध्यमांशी संवाद साधताना आम्ही रात्रीस खेळ चाले असा काही प्रकार शिवसेना करत नाही, जे काही आम्ही करतो ते सर्व दिवसाढवळ्या करतो, तर समोरचे लोक ते फोडून करतात. सध्या आम्हाला विरोधीपक्ष नको, प्रतिस्पर्धी नको असे सुरू असून आमच्या पाठित वार करण्याचा प्रयत्न कोणी करू नये. भाजपकडून शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रावर फर्जिकल स्ट्राईक करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे म्हणाले
भाजपकडून शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रावर फर्जिकल स्ट्राईक – उद्धव ठाकरे
लोकशाहीच्या नावावर राज्यात खेळ सुरू असून हे सर्वकाही लाजिरवाणे आहे. आमचे आमदार कोणी फोडून दाखवावे, मग काय होते ते त्यांचे त्यांनी बघावे असे देखील उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले आहेत. दरम्यान देशात लोकशाहीच्या नावाने जो कारभार सुरु आहे तो चुकीचा आहे. जे नवे हिंदुत्व आले आहे त्याचे हे काम आहे. शिवसेना जे करते ते उघड करते, ते आमदार फोडून करतात. त्यांनी बिहारमध्ये लालू आणि नितीश कुमारांचे सरकार फोडले आणि सरकार पाडले. त्यांच्या मीपणाबद्दल ही लढाई आहे. हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. पाठीवर वार केल्यावर महाराजांनी काय केले होते ते त्यांनी समजून घ्यावे. केंद्रीय मंत्रिमंडळाची राष्ट्रपती राजवट हटवण्यासाठी पहाटे बैठक झाली होती. हे असे झाले जसे पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करायचे होते. यापुढे जे होईल ते कायद्यानुसार संविधानानुसार होईल.
