ही चूक करू नका अन्यथा तुमच्या फोनचा होऊ शकतो स्फोट

शाओमीच्या रेडमी नोट 7एस या स्मार्टफोनमध्ये अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. मुंबईच्या एका युजरने फेसबुकवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली. त्याने सांगितले की, ऑफिसमध्ये काम करत असताना फोन टेबलवर  ठेवला होता. तेव्हा अचानक फोन जळाल्याचा वास येवू लागला. शेअर केलेल्या फोटोमध्ये दिसत आहे की, फोनची खालील बाजू आगीमुळे जळालेली आहे.

युजरने ही घटना मॅन्यूफॅक्चरिंगच्या चुकीमुळे झाली असल्याचे म्हटले आहे. तर शाओमीने यामध्ये संपुर्णपणे चुकी युजरची आहे. असे म्हटले आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, फोनच्या बॅटरीवरून बाहेरून पडलेल्या दवाबामुळे फोनला आग लागली.

या सारख्या अनेक घटना याआधी देखील घडल्या आहेत. फोनचा स्फोट झाल्याने अनेक जणांचे मृत्यू देखील झाले आहेत. अशी घटना होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायला हवी, ते जाणून घेऊया.

कधीही थर्ड पार्टी चार्जिंग केबल अथवा अॅडप्टरचा वापर करू नये. फोनचा ऑरिजनल चार्जरच वापरावा. बॅटरी बदलण्याची गरज असल्यास, नेहमी मॅन्युफॅक्चरी बॅटरीचाच वापर करावा.

फोन अथवा कोणत्याही डिव्हाईसला कोणतेही जळणारे सामान, जसे की, फर्निचर, पेपर यावर ठेवू नये. चार्जिंग सुरू असताना फोन कधीच उशी घाली ठेवू नये.

फोन अथवा कोणतेही डिव्हाईस थेट सुर्याचा प्रकाश पडत असेल, अशा ठिकणी ठेवू नये. डिव्हाईस रिपेअरसाठी द्यायचे असेल तेव्हा अधिकृत सर्विस सेंटरवरच द्यावा. चार्जिंग करताना फोनवर कोणतीही वस्तू ठेवू नये.

Leave a Comment