कोलकाताच्या या वयोवृद्ध जोडप्याच्या फोटोने नेटकऱ्यांचे जिंकले मन

कोलकातामधील एका वयोवृद्ध जोडप्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या वयोवृद्ध जोडप्याच्या फोटोने लोकांचे मन जिंकले आहे. ट्विटर युजर रिशी बाग्रीने 21 नोव्हेंबरला या वृद्ध कपलचा फोटो शेअर केला. कोलकाता मेट्रोमध्ये हा फोटो काढण्यात आलेला आहे.

या फोटोमध्ये एक आजी आजोबांच्या गळ्यात स्कार्फ बांधत आहे. सोबतच त्यांच्या पाठीमागे असलेली एलआयसीच्या जाहीरातीवरील ओळ देखील त्यांचे प्रेम स्पष्ट करत आहे. जाहीरातीवर लिहिण्यात आले आहे की, ‘आनंदाची सुरूवात, आयुष्यभराची साथ.’ या ओळीच त्यांचे प्रेम व्यक्त करत आहेत.

या वृद्ध कपलच्या जीवनातील हा लहानसा क्षण अनेक युवक-युवतींना खऱ्या प्रेमाचा अर्थ सांगून जात आहे.

हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आतापर्यंत 2 हजारांपेक्षा अधिक युजर्सनी या फोटोला लाईक्स केले असून, शेकडो युजर्सनी यावर कमेंट केली आहे.

https://twitter.com/MrNobod13975321/status/1197562835984764928

या वयोवृद्ध जोडप्याचा हा फोटो नेटकऱ्यांच्या मनाला स्पर्शुन जात आहे.

Leave a Comment