परदेशातील हे भारतीय रेस्टोरेंट गरीबांना देते मोफत जेवण

एका रिसर्चनुसार, यूकेमध्ये दररोज 5 हजार लोक उपाशी पोटी झोपतात. अशाच लोकांची मदत करण्यासाठी एक भारतीय रेस्टोरेंट पुढे आले आहे. ग्लासगो येथील एक भारतीय रेस्टोरेंट मागील 4 वर्षांपासून बेघर आणि गरीब लोकांना मोफत जेवण देत आहे. हे जेवण गरजेनुसार, तेव्हाच तयार केले जाते.

गरीब लोकांचे पोट भरणाऱ्या या रेस्टोरेंटचे नाव चारकोल (Charcoal) आहे. या रेस्टोरेंटच्या मालकाचे नाव असद इकबाल आहे. या रेस्टोरेंटचे मॅनेजर सुल्तान आणि त्यांची टीम दररोज गरीब लोकांसाठी जेवण तयार करते.

 

(Source)

सुल्तान सांगतात की, कोणत्याही व्यक्तीच्या बेघर होण्यामागे काहींना काही कारण असते. ते स्वतः याची निवड करत नाहीत. आम्ही असेच त्यांना रस्त्यावर पाहू शकत नाही. कोणी तरी यांची मदत केली पाहिजे. त्यामुळे जेवण देऊन आम्ही त्यांचा थोडा त्रास कमी करण्याचा प्रयत्न करतो.

(Source)

हे रेस्टोरेंट सोमवार आणि मंगळवारी गरीबांना रेस्टोरेंटमध्ये येऊन मोफत जेवण्याचा आग्रह करते. ख्रिसमसपर्यंत स्लिपिंग बँगची देखील सोय करण्याची त्यांची योजना आहे. यासाठी ते आपल्या ग्राहकांना देखील मदत मागत आहेत.

Leave a Comment