या दोन केंद्रशासित प्रदेशांचे होणार विलिनिकरण, केंद्र सरकारचा मो निर्णय

केंद्र सरकार दोन केंद्रशासित प्रदेश दमन-दीव आणि दादरा-नगर हवेली यांच्या विलिनिकरणाची योजना बनवत आहे. दोन्ही प्रदेशांच्या विलिनिकरणाचा प्रस्ताव पुढील आठवड्यात लोकसभेत सादर केला जाणार आहे. केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल यांनी याबाबत माहिती दिली.

मेघवाल यांनी सांगितले की, ‘दादरा-नगर हवेली आणि दमन दीव मर्जर ऑफ युनियन टेरिटेरीज बिल 2019’ पुढील आठवड्यात लोकसभेत सादर करण्यात येणाऱ्या बिलांच्या सुचीत आहे. अधिकाऱ्यांनुसार, या विलिनिकरणामुळए अधिक चांगले प्रशासन आणि अनेक गोष्टींवर लक्ष ठेवण्यास मदत होईल.

सध्या दोन्ही केंद्रशासित प्रदेशांसाठी वेगवगळे बजेट आणि सचिवालय आहे. दोन्हींमध्ये केवळ 35 किमीचे अंतर आहे. दादरा-नगर हवेलीमध्ये केवळ 1 तर दमन-दीवमध्ये 2 जिल्हे आहेत. नवीन केंद्रशासित प्रदेशाचे नाव दादरा, नगर हवेली, दमन आणि दीव असे असेल. याचे मुख्यालय दमन-दीव येथे असेल.

याआधी केंद्र सरकारने 5 ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मिरमधील कलम 370 हटवत दोन केंद्रशासित प्रदेश बनवले होते. त्यानंतर केंद्रशासित प्रदेशांची संख्या 9 झाली आहे. मात्र आता दमन-दीव आणि दादरा-नगर हवेलीच्या विलिनिकरणानंतर ही संख्या 8 होईल.

Leave a Comment