बँकेने एकाच नावाने बनवली दोन खाती, पुढे काय झाले बघाच

मध्य प्रदेशच्या भिंडमधील एका व्यक्तीने पंतप्रधान मोदींच्या निवडणुकीतील भाषणाला एवढे गंभीरतेने घेतली की, त्याला आता अडचणीचा सामना करावा लागत आहे. भिंड जिल्ह्यातील एसबीआय बँकेच्या एका शाखेच्या चुकीमुळे एका व्यक्तीची कमाई दुसरीच व्यक्ती बँकेतून काढून वापर होती. पैसे काढणारा व्यक्ती समजत होता की, हे पैसे नरेंद्र मोदींनी टाकले आहेत.

रुरई गावात राहणाऱ्या हुकूम सिंह आणि रोनी गावात राहणाऱ्या हुकूम सिंह या दोघांनी देखील आलमपूर येथील एसबीआयच्या शाखेत खाते उघडले. मात्र बँकेच्या कर्मचाऱ्याने पासबूकवर फोटो केवळ वेगळे लावले. त्या व्यतरिक्त दोघांचा पत्ता, खातेनंबर एकच होते. थोडक्यात एकाच खात्याचे दोन मालक झाले.

खाते उघडल्यानंतर रुरईचे हुकूम सिंह कुशवाहा कामासाठी हरियाणाला गेले. तेथे पैसे वाचून ते आपल्या खात्यात जमा करत होते. मात्र तिकडे रोनी गावातील हुकूम सिंह बँकेतून पैसे काढत होता. ते देखील केवळ एक-दोन दिवस नाही तर तब्बल सहा महिने हे सुरू होते. 6 महिन्यात त्याने तब्बल 89 हजार रुपये काढले.

जेव्हा रुरईच्या हुकूम सिंह यांना जमीन खरेदी करायची होती, त्यावेळी हे संपुर्ण प्रकरण समोर आले. बँकेत पैसे काढायला गेल्यावर त्यांना समजले की, खात्यात केवळ 35 हजार 400 रुपयेच शिल्लक आहेत. त्यांच्यानुसार त्यांनी आतापर्यंत 1 लाख 40 हजार रुपये जमा केले होते. त्यानंतर त्यांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांकडे तक्रार केली, मात्र त्यांनी ही गोष्ट दाबण्याचा प्रयत्न केला.

बँकेचे मॅनेजर राजेश सोनकर यांनी त्यांना पैसे मिळतील, असे सांगितले आहे. मात्र तपास केल्यावर समोर आले की, पैसे तर रोनी गावातील हुकूम सिंह यांच्या जवळ आहेत. याविषयी त्याला विचारण्यात आले तेव्हा त्याने सांगितले की, माझे खाते होते. त्यात पैसे येत होते. मला वाटले मोदीजी पैसे टाकत आहेत, म्हणून मी पैसे काढले. आमच्याकडे पैसे नव्हते. आम्हाला गरज होती. आम्ही घराचे काम केले होते. त्यामुळे पैसे काढावे लागले.

Leave a Comment