अजित पवारांची विधीमंडळ पक्षनेतेपदावरुन हकालपट्टी


मुंबई – अजित पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपदावरुन राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हकालपट्टी करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळीच मुख्यमंत्री म्हणून तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. आज सकाळी महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा ट्विस्ट पाहण्यास मिळाला. काल रात्री महाविकासआघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंच्या नावाला मुख्यमंत्री म्हणून पसंती मिळाली होती. उद्धव ठाकरेंनी हा प्रस्ताव स्वीकारल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले होते. पण राजभवनात आज सकाळी ८ च्या सुमारास शपथविधी पार पडला.

पण शरद पवार यांनी ट्विट करुन अजित पवार यांनी घेतलेला निर्णय पक्षाचा नसल्याचे केल्यामुळे अजित पवारांना मानणारा गट भाजपसोबत गेल्याची चर्चा आहे. नेमके काय घडले आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण विधीमंडळ पक्षनेतेपदावरुन अजित पवार यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच गेल्या जवळपास २९ ते ३० दिवसांपासून सुटत नव्हता. महायुतीला बहुमत मिळाले होते. पण पहिल्याच दिवशी आमच्यापुढे सगळे पर्याय खुले असल्याचे शिवसेनेने जाहीर केले. तसेच अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घ्यावे असेही त्यांनी म्हटल्यानंतर असे काहीही ठरले नसल्याचे भाजपने म्हटले होते. त्यानंतर युती तुटली, शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढण्यात आले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्यास शिवसेनेने संमती दर्शवली. महाविकास आघाडी स्थापन झाली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावे म्हणून त्या बैठकीत आग्रह झाला, तसा प्रस्तावही मांडण्यात आला. असे सगळे असताना आज महाराष्ट्रातील राजकारणातला सर्वात मोठा ट्विस्ट पाहण्यास मिळाल्यानंतर अजित पवार यांची विधीमंडळ पक्षनेते पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.

Leave a Comment