अजित पवारांनी शरद पवारांना दगा दिला – संजय राऊत


मुंबई – राज्यामध्ये राजकीय भूकंप झाला असून राज्यात भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी करत सरकार स्थापन केले. देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये पुन्हा मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांचा शपथविधी आज सकाळी राजभवनात पार पडला.

त्यानंतर शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार यांनी सत्ता स्थापनेच्या चर्चे दरम्यान अजित पवारांची हालचाली संशयास्पद होत्या. बैठकीमधून ते बाहेर पडल्यानंतर त्यांचा फोन बंद येत होता. त्यावर त्यांनी वकिलाकडे बसलो होतो, असे सांगितले. ते कोणत्या वकिलासोबत बसले होते ते आता कळले आहे. शरद पवार यांचा यामध्ये कसलाही सहभाग नसल्याचे म्हटले आहे. शरद पवारांना अजित पवार यांनी दगा दिला. महाराष्ट्राच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसला. अजित पवारांवर दबाव आणून त्यांना आणि आमदारांना फोडले आहे का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.

राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महाआघाडी तयार करीत होतो. पण अजित पवारांनी रात्रीच्या अंधारात डाका टाकला. रात्रीच्या रात्री पाप केले जाते, चोरी केली जाते. दिवसाच्या उजेडात त्यांनी शपथ का घेतली नाही, असे संजय राऊत म्हणाले. या वयात शरद पवार यांना अजित पवारांनी दगा देण्याचा प्रयत्न केला आहे, तो महाराष्ट्राला आवडलेला नाही. पडद्यामागे पैसा आणि सत्तेचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप देखील संजय राऊतांनी केला. राज्यातील जनता हे पाप धुऊन काढल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.

शरद पवार यांची लोकप्रियता अजित पवार यांना आवडत नसल्यामुळे अजित पवार यांनी भाजपसोबत वेगळा घेऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेहमी अजित पवार यांची जागा तुरुंगात आहे, असे म्हणत होते. त्यांची धमकी भाजपने अजित पवार यांना दिली का? असा प्रश्न देखील त्यांनी संजय राऊत यांनी उपस्थित केला.

Leave a Comment