नॉर्मल टेंपरेचर म्हणजे काय?


माणसाच्या शरीराचे तापमान ९८.६ फॅरनहिट असते असे सरसकट मानले जाते आणि त्यापेक्षा थोडेजरी तापमान वाढले तर त्या माणसाला ताप आला असे समजले जाते आणि तो डॉक्टरकडे धाव घेतो. काही वर्षांपासून जर्मन डॉक्टरने केलेल्या काही निरीक्षणातून हे ९८.६ फॅरनहिटचे खूळ निर्माण झाले आणि आपल्या बर्‍याच वैद्यकीय समजुती त्या भोवती फिरायला लागल्या. १८६८ सालपासून हे चाललेले आहे. परंतु खरोखरच सर्वांचे शरीराचे तापमान सातत्याने ९८.६ फॅरनहिटच असते का? आणि त्यापेक्षा ते थोडेबहुत वाढले म्हणून तो माणूस आजारी पडला आहे असे समजावे का? असे प्रश्‍न आता चर्चिले जात आहेत. डॉ. शारंग सचदेव यांनी हा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या मते ९८.६ फॅरनहिट हे तापमान सातत्याने सरासरी असतेच असे नाही.

९८.६ हे निरोगी वृध्द व्यक्तीच्या शरीराचे सरासरी तापमान आहे. परंतु ज्या व्यक्तीला काहीतरी काम करावे लागते, कष्ट करावे लागतात किंवा कसल्या ना कसल्या हालचाली कराव्या लागतात त्याच्या शरीराचे तापमान ९९ अशांपर्यंत वाढू शकते. त्याच्या प्रकृतीत कसलाही दोष नसतानाही आणि तो निरोगी स्वस्थ असतानाही ते तापमान ९९ डिग्रीपर्यंत वाढू शकते आणि तेवढे तापमान असूनही तो माणूस आरोग्यदृष्ट्या निरामय असतो. म्हणजे कामे करणार्‍या व्यक्तीच्या शरीराचे तापमान हे सामान्यतः सरासरी मानलेल्या तापमानापेक्षा जास्त असू शकते. ते या मानीव सरासरीपेक्षा एखाद्या अंशांने वाढले तर घाबरून जाऊन डॉक्टरकडे धाव घेण्याची काही गरज नाही.

व्यक्तीगणिक हे सरासरी तापमान जास्त असू शकते. लहान मुलांत तर ते ९९.७ पर्यंत वाढू शकते. ते सरासरीपेक्षा १ टक्क्यांनी जास्त असूनही त्याला नॉर्मलच मानावे लागते. कारण तेवढे तापमान असूनही त्या लहान मुलाच्या आरोग्यास काही धोका निर्माण झालेला नसतो. लोकांच्या शरीराचे तापमान हे प्रसंगानुरूपसुध्दा बदलू शकते. ९८.६ अंश फॅरनहिट एवढे सामान्य तापमान असणार्‍या व्यक्तीचा ताप सकाळी जास्त असेल तर संध्याकाळी कमी होईल. म्हणजे दिवसाच्या वेळा बदलल्या जातील तसतसे तापमान कमी होत जाते. शरीराचा ताप वाढला म्हणून केवळ डॉक्टरकडे धाव घेण्याची गरज नसते. मात्र वाढलेल्या तापाबरोबर अंग दुखत असेल, श्‍वास घेण्यास त्रास होत असेल, लघवी विचित्र वास येत असेल किंवा लघवी करताना त्रास होत असेल असे काही त्रास असले तरच डॉक्टरकडे धाव घ्यावी.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही