UIDAI ने लाँच केले आधार कार्डाशी संबंधित नवीन अ‍ॅप

आधार कार्ड प्रत्येक भारतीय नागरिकासाठी महत्त्वपुर्ण कागदपत्र आहे. बँकेत खाते उघडण्यापासून ते सिमकार्ड खरेदी करण्यापर्यंत सर्व कामांसाठी आधारकार्ड गरजेचे आहे.

आधार कार्ड संबंधित कामांसाठी यूआयडीएआयने एक नवीन अ‍ॅप लाँच केले आहे. mAadhaar अ‍ॅपमध्ये नागरिकांना आधार संबंधित अनेक सेवा मिळतील. यामध्ये आधार डाउनलोड करणे, त्याचे स्टेट्स चेक करणे, आधार रिप्रिंटसाठी ऑर्डर देणे आणि आधार केंद्राची माहिती मिळवणे याचा समावेश आहे. अ‍ॅपद्वारे बायोमॅट्रिक लॉक आणि अनलॉकचा देखील पर्याय आहे.

यूआयडीएआयने जुने अ‍ॅप अन इंस्टॉल करून नवीन अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगितले आहे.

या अ‍ॅपवर सेवेचे दोन सेक्शन आहेत –

पहिला सेक्शन – मुख्य सर्विस डॅशबोर्ड, रिप्रिंट ऑर्डर, पत्ता बदलणे, ऑफलाइन ई-केवायसी डाउनलोड, क्यूआर कोड स्कॅन

दुसरे सेक्शन – माय आधार सेक्शन, यामध्ये आधार प्रोफाइलसाठी पर्सनलाइज्ड सेक्शन मिळेल.

Leave a Comment