आता ट्विटरवर तुम्ही ‘हाइड’ करू शकता रिप्लाय

मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने आपल्या युजर्ससाठी खास फीचर्स लाँच केले आहे. हे फीचर हाइड रिप्लाय हे आहे. या फीचरद्वारे युजर्स आता अपमानकारक आणि त्रास देणाऱ्या रिप्लायला हाइड करू शकतील. युजर्सच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे फीचर आणण्यात आले आहे.

ट्विटरने नवीन फीचरबद्दल सांगितले की, युजर हाइड करण्यात आलेल्या रिप्लायला ग्रे रंगाच्या आयकॉनवर क्लिक करून पाहू शकतील. मात्र हे रिप्लाय एक्टिव राहणार नाहीत. याशिवाय ज्या युजर्सचे रिप्लाय हाइड करण्यात आलेले आहेत, ते पुर्ण कर्न्वसेशन पाहू शकतील.

ट्विटरने याआधी काही मोजक्याच देशात हाइड फीचर लाँच केले होते. ट्विटर आपल्या युजर्ससाठी अनेक खास फीचर्स आणत आहे. ट्विटर सध्या ट्विट शेड्यूल फीचर टेस्ट करत आहे. या फीचरद्वारे कंपनी ट्विट शेड्यूल करू शकतात.

Leave a Comment