समुद्रामध्ये लपले आहे आपल्या सौंदर्याचे रहस्य


समुद्राच्या कुशीमध्ये अनेक रहस्ये दडलेली आहेत. या मध्ये आपल्या शरीराची सुंदरता वाढविणाऱ्या अनेक वस्तू आहेत. आपल्या त्वचेला आणि केसांना पोषण आणि आर्द्रता देणाऱ्या या वस्तू आहेत. या वस्तूंच्या वापरामुळे त्वचेवर उमटलेल्या अकाली प्रौढत्वाच्या खुणा कमी होण्यास मदत होऊन त्वचा नितळ आणि सुंदर बनते. तसेच केसांचे आरोग्य वाढून ते चमकदार होण्यासही मदत मिळते.

सी केल्प ही समुद्राच्या पाण्यावर निर्माण होणारी एकपेशीय वनस्पती ( algae ) आहे. या वनस्पतीमध्ये प्रथिने, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि इतर क्षार मुबलक मात्रेमध्ये असतात. ऊन, प्रदूषण आणि काही अंशी आपण वापरत असलेली रसायनयुक्त प्रसाधने यांच्यामुळे आपल्या त्वचेचे नुकसान होत असते. हे त्वचेवरील दुष्परिणाम कमी करण्यासाठी सी केल्प मधील क्षार फायदेकारक आहेत. त्वचेवर येणाऱ्या सुराकुत्याही सी केल्प च्या वापरामुळे कमी होण्यास मदत मिळते. यामध्ये असणारी पोषक द्रव्ये केसांच्या आरोग्याकरिताही चांगली आहेत.

सी क्ले म्हणजे समुद्राच्या तळाशी सापडणारी मुलतानी माती सदृश माती. या सी क्ले च्या लेपाच्या वापरामुळे त्वचेमधील टॉक्सीन्स किंवा हानिकारक तत्वे बाहेर पडण्यास मदत होते. त्यामुळे त्वचेला पोषण मिळून आर्द्रता प्राप्त होते. सी क्ले त्वचेमधील सेल्युलाईट कमी करण्यास मदत करते. सी क्ले चा वापर केसांकरिताही करता येऊ शकतो. सी क्ले चा लेप केसांना लावल्यास केसांचा तेलकटपणा कमी होण्यास मदत मिळते. त्याचबरोबर सी क्ले च्या लेपाने केस मुलायम होतात.

सी सॉल्ट, म्हणजेच समुद्री मीठ. याच्या मध्ये इलेक्ट्रोलाईट्स आणि क्षार मुबलक मात्रेमध्ये असल्याने त्वचेला एक्सफोलिएट करण्यास , म्हणजेच त्वचेवरील मृत पेशी हटविण्यास, सी सॉल्ट चा वापर , एक नैसर्गिक स्क्रब म्हणून करता येतो. तसेच गरम पाण्यामध्ये हे मीठ घालून त्याने स्नान केल्यास त्वचेवरील रंध्रे ( pores ) मोकळी होण्यास मदत मिळते. त्वचेमधील विषारी द्रव्ये आणि घामामुळे त्वचेवर साठलेला मळ ही समुद्री मिठाच्या सहाय्याने साफ करता येतो. तसेच याच्या वापरामुळे त्वचेला आर्द्रता मिळते.

ग्रीन seeseसी वीड चा वापर त्वचा आणि केस या दोन्हीसाठी ‘ सुपरफूड ‘ म्हणून केला जातो. या मध्ये अकाली वृद्धत्वाच्या खुणा चेहऱ्यावरून पुसून टाकण्याचे सामर्थ्य आहे. सी वीड एक नैसर्गिक क्लेंजर आणि प्युरीफायर आहे. याच्या वापरामुळे त्वचेचा pPH स्तर सुधारून त्याचे योग्य संतुलन राखले जाते. बीटा कॅरोटीन, पोटॅशियम, झिंक आणि आयोडीन ही सी वीड मध्ये असणारी पोषक द्रव्ये त्वचेमधील कोलाजेन वाढविण्यास मदत करतात. तसेच यामध्ये त्वचेवरील सूज किंवा संवेदनशीलता कमी करण्याचेही गुणधर्म आहेत.

ब्राऊन अल्गी या नावाचे सी वीड थंड पाण्यावर पैदा होणारे आहे. खास त्वचेच्या आरोग्यासाठी बाजारामध्ये जी उत्पादने मिळतात ती बनविण्यासाठी ब्राऊन अल्गी वापरलेली आढळते. त्वचेचा पोत सुधारण्यास ही अल्गी अतिशय चांगली समजली जाते. त्वचेला नैसर्गिकरीत्या थंडावा देणारी ही अल्गी एक अतिशय उत्तम मॉइश्चरायझर आहे. तसेच एक्झिमा या त्वचारोगासाठीही ही अल्गी अतिशय उपयुक्त समजली जाते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment