वेस्‍टइंडीज विरूद्ध होणाऱ्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा


नवी दिल्ली – बीसीसीआयच्या निवड समितीने वेस्‍टइंडीज विरूद्ध होणाऱ्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. संघात बांगलादेश विरूद्ध विश्रांती दिलेल्या कर्णधार विराट कोहलीचे पुनरागमन झाले आहे. भारतीय संघाची घोषणा कोलकात्यात झालेल्या निवड समितीच्या बैठकी दरम्यान करण्यात आली.

तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेला 6 डिसेंबरपासून सुरुवात होईल. यातील पहिला सामना मुंबई येथे खेळवला जाणार आहे. 15 डिसेंबरपासून एकदिवसीय मालिकेला सुरूवात होईल. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना चेन्नई येथे होणार आहे. बांगलादेश विरूद्ध खेळवलेल्या नवीन चेहऱ्यांवर विश्वास दाखवत निवड समितीने त्यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे.

यष्टिरक्षक ऋषभ पंतवर क्रिकेट प्रेमींकडून जोरदार टीका होत असतानाही निवड समितीने पंतचा संघात समावेश केला आहे. एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी यष्टिरक्षणाची जबाबदारी पंतवरच आहे. वेगवान गोलंदाज भुवनेश्‍वर कुमारचे दुखापतीनंतर संघात पुनरागमन झाले आहे.

Leave a Comment