मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर विराजमान


मुंबई : मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर या विराजमान झाल्या असून किशोरी पेडणेकर यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. उपमहापौरपदासाठी सुहास वाडकर यांचे नाव निश्चित झाले आहे.

मुंबई महापालिकेच्या (191 G/S) वरळीतील गांधीनगर-डाऊन मिलमधील किशोरी पेडणेकर या नगरसेविका आहेत. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले आहे. वरळीतील बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल या शाळेत त्या शिकल्या आहेत. किशोरी पेडणेकर या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका असून विरोधकांना परखड उत्तर देणाऱ्या नेत्या अशी कायम किशोरी पेडणेकर यांची ओळख आहे. वरळीला शिवसेनेचा गड बनवण्यात किशोरी पेडणेकर यांचा मोठा वाटा आहे.

अनेक ज्येष्ठ नगरसेवकांनी मुंबईच्या महापौरपदासाठी दावा केला होता. यशवंत जाधव, मंगेश सातमकर यांसारख्या स्थायी समितीच्या सदस्यांनी महापौरपदासाठी दावा केला होता. पण शिवसेनेकडून शेवटच्या क्षणी महापौरपदासाठी किशोरी पेडणेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

Leave a Comment