तुम्हाला माहित आहे का इस्त्रोमधील कर्मचाऱ्यांना किती मिळतो पगार ?

मिशन चंद्रयान 2 प्रगतीपथावर असताना, सर्वत्र इस्त्रोचीच चर्चा असते. असेच काही क्षण देशातील युवकांना प्रेरणा देत असतात. या मिशनमुळे अनेक तरूणांना इस्त्रोमध्ये सहभागी व्हावे असे देखील वाटले असेल. मात्र पहिला प्रश्न डोक्यात आला असेल तो म्हणजे इस्त्रोच्या वैज्ञानिकांना पगार किती असतो ?

इस्त्रोच्या वैज्ञानिक आणि कर्मचाऱ्यांना चांगला पगार मिळतो. अर्थात या कामाद्वारे मिळणारे समाधान पैशांशी जोडले जाऊ शकत नाही. मात्र प्रत्येक कामाची एक बाजू पगार देखील असते.

क्वर्ट्झ इंडियानुसार, इस्त्रोमध्ये एका कर्मचाऱ्याकडे अनेक प्रकारची काम असतात. ज्यासाठी वर्षाला सरासरी 1.5 लाख ते 6.12 लाखांपर्यंत पगार दिला जातो. उदाहरणार्थ, टेक्निकल असिस्टेंट जे मशीन्सची काळजी घेतात त्यांना वर्षाला सरासरी 2.36 लाख ते 6 लाखांपर्यंत पगार आहे.

सरासरी पगार बघून असे वाटते की, सर्वसाधारण कंपनीत कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पगारा एवढाच पगार इस्त्रोच्या कर्मचाऱ्यांना आहे. द वायरनुसार, या वर्षी सप्टेंबर महिन्यात इस्त्रोच्या वैज्ञानिकांनी विरोध प्रदर्शन केले होते. कारण त्यांच्या पगारातून 10 हजार रुपये कमी करण्यात आले होते.

सुरूवाती स्तरावार सर्वाधिक पगार महिन्याला 81,195 रुपये मिळतो. यामध्ये सर्व भत्ते जोडलेले आहेत. जी व्यक्ती आयआयटी या सारख्या संस्थांमधून इस्त्रोशी जोडली जाते, त्यांनी वार्षिक 9 ते 12 लाख रुपये वेतन मिळते.

सध्या इस्त्रोमध्ये 94 पदे रिक्त आहेत. त्यात 3 प्रोजेक्ट ट्रेनी, 1 रिसर्च असोसिएट आणि 90 बी लेव्हल टेक्निशियंसचा समावेश आहे.

Leave a Comment