24 वर्षांची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने कारागृहातूनच केला 7 कोटींचा घोटाळा

24 वर्षांची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने कारागृहातूनच ऑनलाईन पद्धतीने 1 मिलियन डॉलरचा (जवळपास 7 कोटी रुपये) घोटाळा केला आहे. होप ओल्सपल अर्को या कैद्याने नायजेरियाच्या लागोस या कारागृहात असतानाच पैसे चोरले. त्याला एका गुन्ह्याखाली 24 वर्षांची शिक्षा झालेली आहे. त्याने कारागृहात असतानाच कशाप्रकारे हा घोटाळा केला याची माहिती अधिकारी घेत आहेत.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, कारागृहात असताना देखील त्याच्याकडे फोन होता व तो इंटरनेटचा वापर करत होता. अधिकाऱ्यांना प्राथमिक तपासात आढळले की, काही दिवसांपुर्वी त्याला नायजेरियन पोलीस हॉस्पिटलमध्ये देखील भरती करण्यात आले होते.  याशिवाय हॉस्पिटलमधून बाहेर पडत तो आपली बायको व मुलांना देखील भेटला होता. त्याने कार्यक्रमांमध्ये देखील भाग घेतला व या वेळी तो हॉटेलमध्ये थांबला होता.

2012 मध्ये या त्याला अटक करण्यात आली होती. कारागृहात असताना त्याने खोट्या नावाने दोन बँक खाती उघडली व लग्झरी कार्स देखील खरेदी केल्या. बायकोच्या बँक अकाउंटचे अधिकार देखील त्याच्याकडे होते व त्याद्वारे तो पैसे ट्रांसफर करत होता.

लाचलुचपत प्रतिबंधकचे अधिकारी या घटनेचा तपास करत असून, कैद्याला हॉस्पिटलमध्ये का दाखल करण्यात आले होते व तो इतर ठिकाणी त्याने कसा प्रवास केला ?, याची माहिती घेत आहेत. तुरूंगातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मदतीने त्याने हे कारस्थान केले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.