भारतीय लष्कराचे जवानांना व्हॉट्सअ‍ॅपची सेटिंग बदलण्याचे आदेश

भारतीय सेनेने सर्व जवानांना व्हॉट्सअ‍ॅप संबंधित एक सूचना जारी केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, सर्व जवांनानी व्हॉट्सअ‍ॅप सेटिंग्स त्वरित बदलावी जेणेकरून, पाकिस्तानी हेर ग्रुपमध्ये अ‍ॅड करू शकणार नाहीत. काही दिवसांपुर्वीच भारतीय सैन्यातील एका जवानाचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर त्यांच्या परवानगी शिवाय पाकिस्तानशी संबंधित ग्रुपमध्ये अ‍ॅड करण्यात आला होता.

जर तुमच्या परवानगीशिवाय ग्रुपमध्ये तुम्हाला अ‍ॅड व्हायचे नसेल तर यासाठी तुम्हाला सेटिंग्स बदलाव्या लागतील. यासाठी सर्वात प्रथम व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करा. त्यानंतर Account > Privacy > Groups मध्ये जा. तेथे तुम्हाला नोबडी, माय कॉन्टॅक्ट्स आणि इव्हेरवन असे पर्याय दिसतील. जर तुम्ही Nobody हा पर्याय निवडला तर तुम्हाला कोणीही तुमच्या परवानगी शिवाय ग्रुपमध्ये अ‍ॅड करू शकणार नाही.

याआधी देखील भारतीय गुप्तचर यंत्रणेने भारतीय लष्करातील अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या कुटूंबाना सोशल मीडियापासून सावध राहण्यास सांगितले आहे.  व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पाकिस्तानकडून हेरगिरी आणि हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Leave a Comment