पिक्सल स्मार्टफोन हॅक करा आणि गुगलकडून मिळवा 10.76 कोटी रुपये

गुगलने  हॅकर्ससाठी एक खास ऑफर आणली आहे. कंपनी पिक्सल स्मार्टफोन्स हॅक करून दाखवणाऱ्याला तब्बल 1.5 मिलियन डॉलर (जवळपास 10 कोटी 76 लाख रुपये) बक्षीस म्हणून देणार आहे. गुगलने आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले की, पिक्सल डिव्हाईसमधील Titan M चिपची सिक्युरिटी तोडून दाखवणाऱ्याला कंपनी बक्षीस देईल. टायटन एम चीप खास पिक्सल स्मार्टफोनसाठी तयार करण्यात आलेली आहे. यामुळे डिव्हाईस सुरक्षित राहते.

टायटन एम ला सर्व डिव्हाईसेजमध्ये बिल्ट इन सिक्युरिटी देण्यासाठी सर्वाधिक रेटिंग देण्यात आलेली आहे. गुगलने सांगितले की, या रिसर्चमध्ये त्रुटी शोधून दाखवल्याने आम्ही ती दुरूस्त करू शकू. जेणेकरून युजर्सला चांगल्या सेवेसह चांगली सुरक्षितता देता येईल. म्हणून हे बक्षीस ठेवण्यात आलेले आहे.

एवढेच नाही तर गुगलने अँड्राईड व्हर्जनमध्ये देखील त्रुटी शोधणाऱ्याला देखील बक्षीस देणार असल्याची घोषणा केली आहे. यामध्ये त्रुटी शोधणाऱ्याला 50 टक्के रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येईल. म्हणजेच टायटन एम चीपची सिक्युरिटी आणि अँड्राईट व्हर्जन हॅक करणाऱ्याला एकूण 1.5 मिलियन डॉलर मिळतील.

गुगलने अँड्राईडसाठी बग बाउंटी प्रोग्रामची सुरूवात 2015 मध्ये केली होती. याद्वारे आतापर्यंत 1800 जणांना बक्षीस देण्यात आलेले आहे. यासाठी कंपनीने मागील 4 वर्षात 4 मिलियन डॉलर रुपये दिले आहेत. मागील 12 महिन्यातच गुगलच्या सिस्टिममध्ये त्रुटी शोधणाऱ्यांना कंपनीने 1.5 मिलियन डॉलरचे बक्षीस दिले आहे.

Leave a Comment