मानवाधिकाराला नुकसान पोहचवणारी परिस्थिती निर्माण करत आहे फेसबुक आणि गुगल

मानवाधिकारासाठी काम करणारी आंतरराष्ट्रीय संघटना अ‍ॅमेन्सटी इंटरनॅशनलने गुगल आणि फेसबुकच्या बिझनेस मॉडेलला मानवाधिकारीसाठी धोकादायक असल्याचे म्हटले आहे. अ‍ॅमेन्सटीच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, या टेक कंपनींद्वारे करण्यात येणारी ‘व्यापक देखरेख’ चिंताजनक आहे. संघटनेने दावा केला आहे की, या प्लॅटफॉर्मद्वारे मोठ्या प्रमाणात मानवाधिकाराला नुकसान पोहचवणारी परिस्थिती निर्माण केली जात आहे.

फेसबुकने मात्र या रिपोर्टवर असहमती दर्शवली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, ते मानवाधिकारांना आणखी मजबूत करत आहेत. तर गुगलने म्हटले आहे की, ते लोकांच्या विश्वासाचे केंद्र आहे आणि त्यांना युजर्सच्या माहितीच्या सुरक्षेप्रती जबाबदारी देखील आहे. गुगल जगभरात 90 टक्के वापरले जाणारे सर्च इंजिन आहे. तर जगभरातील एक तृतीयांश लोक दररोज फेसबुकचा वापर करतात.

संघटनेने म्हटले आहे की, लोकांच्या माहितीवर या टेक कंपन्या लक्ष ठेवण्याचे काम करतात. त्यामुळे यांच्या आधारभूत बिझनेस मॉडेलमध्ये बदल करण्याची गरज आहे. अ‍ॅमेन्सटीने म्हटले आहे की, भलेही या कंपन्या आपल्या सेवेबद्दल कोणतेही शुल्क घेत नाहीत, तरी युजर्सला खाजगी माहितीद्वारे याची किंमत चुकवावी लागत आहे.

या रिपोर्टमध्ये कॅब्रिज एनालिटिका प्रकरणाचा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे. याप्रकरणावर फेसबुकने म्हटले की, आमचे बिझनेस मॉडेल जाहिरातींवर अवलंबून आहे आणि आम्ही लोकांना त्यांचा आवाज उंचवण्याचा व एकत्र येण्यास मदत करतो. याद्वारे मानवाधिकारालाच प्रोत्साहन देण्यात येत आहे.

गुगलने या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, आम्ही युजर्सच्या खाजगी माहितीची सुरक्षा करतो आणि त्या दिशेने काम करत आहे. आम्हाला माहिती आहे की, लोक सुचनांविषयी आमच्यावर विश्वास ठेवतात आणि त्याची रक्षा करणे आमची जबाबदारी आहे. मागील 18 महिन्यात यात अनेक बदल करण्यात आले आहे.

Leave a Comment