इंटरनेटवरून कमवा पैसे


केवळ चॅटिंग किंवा सर्फिंगसाठी इंटरनेट नसून त्याकडे उत्पन्नाचा भाग म्हणून पाहता येते. विविध संकेतस्थळांच्या मदतीने आपण विविध उपक्रम, प्रोजेक्‍ट, ट्यूशन, शैक्षणिकविषयक काम करू शकतो. त्याबदल्यात आपल्याला बक्कळ पैसाही मिळतो. घरबसल्या अर्थाजन करण्यासाठी काही संकेतस्थळ आपल्या मदतीला आहे.

पेपरकोच : पेपरकोच संकेतस्थळ हे शाळा, कॉलेज, पदवी, पदवीधारक, पीएचडीधारक किंवा अभ्यासक्रमाशी निगडीत असलेल्या पेपरवर्कसाठी मदत करते. पुस्तक परीक्षण, निबंध, प्रवेशासाठी आवश्‍यक असणारे निबंध तयार करणे, बायोडेटा, सिव्ही तयार करणे, व्यावसायाचे नियोजन यासंबंधी साहित्याचे मार्गदर्शन हे संकेतस्थळ करते. या आधारे आपण प्रोफाईल तयार करून कामाची मागणी करू शकतो. लिंकडेन साईटवर असणाऱ्या ग्रुपमध्ये आपला सीव्ही अपलोड केल्यास गरजेनुसार कामाची मागणी होते. अमेरिकेत पेपरकोचला मागणी असून अशा प्रकारचे काम करण्यासाठी तुम्ही अमेरिकेचे नागरिक असण्याचे गरज नाही.

हॅशलर्न: हॅशलर्न हा एक भारतातील मोबाईल ट्यूटेरिंग ऍप आहे. या ऍपच्या माध्यमातून आठवी ते बारावी, जेईई, नीट, सीईटी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता येते. हे ऍप विद्यार्थ्यांना होमवर्क पूर्ण करण्यासाठी मदत करते. विद्यार्थ्यांना शिकवण्यात येणाऱ्या विविध विषयातील अडचणी दूर करण्याचे काम आपण ऍपच्या मदतीने करू शकतो. आपण जर एखादा विषय निवडला तर ऍप त्या विषयाची संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन करते. त्यासाठी शुल्काची आकारणी केली जाते. आपण संबंधित विद्यार्थ्यास शुल्काची आकारणी करून ट्यूशन घेऊ शकतो.

छेग : छेग संकेतस्थळ आजघडीला ट्यूशनसाठी उत्तम मानले जाते. या संकेतस्थळावर विविध विद्यापीठांचे, शाळेचे प्राध्यापक शिकवतात. यात कॉम्प्युटर सायन्स, बिजगणित, अकाऊंट, फ्रेंच भाषा या विषयाचा समावेश आहे. छेग ऍप डाऊनलोड केल्यानंतर त्या मदतीने आपण शिकवणी घेऊ शकतात आणि अर्थाजन करू शकतात. असंख्य विषयाचे तज्ज्ञ या ऍप्सशी जोडले गेले आहे. त्याचा लाभ घेऊन आपण घरबसल्या कमाई करू शकतो.

स्कूल सॉल्व्हर: फोर्बस, माशेबल आणि टेकक्रंच कंपनीने पुरस्कृत केलेले स्कूल सॉल्व्हर हे होमवर्कसाठी प्रसिद्ध मानले जातात. विविध असायनमेंट पूर्ण करण्यासाठी स्कूल सॉल्वरचा उपयुक्त ठरतात. हे स्कूल सॉल्वर महिन्याकाठी 50 हजारापर्यंत कमाई करतात. शाळेचे, मुलांचे प्रोजेक्‍ट स्कूल सॉल्वरच्या मदतीने पूर्ण केले जातात. अशी अनेक संकेतस्थळे सध्या आपल्याला रोजगार मिळवून देतात. मात्र, यासंदर्भातील कोणताही आर्थिक व्यवहार करताना अत्यंत काळजीपूर्वक करणे आवश्‍यक आहे.

Leave a Comment