चला, जमिनीखाली घर बांधू…


जगात फिरण्यासाठी अनेक ठिकाणं आहेत. जमीनवर पाणी, हवेत फिरल्यानंतर, राहिल्यानंतर आता जमिनीखाली राहण्यासाठी माणसांची धडपड सुरू आहे. ऑस्‍ट्रेलियामधील कुबर पेडी हे असंच एक शहर जमिनीच्या खाली वसलेलं आहे. एडीलेडपासून सुमारे 800 किलोमीटर दुर एकांतात हे शहर असून आजुबाजू डोंगर आणि खडक आहेत.

1955 मध्ये हे शहर सर्वात जास्त चर्चत आलं. या परिसरात दुधाळ रंगाचे खडक मोठ्या प्रमाणात आहेत. जगातील दुधाळ खडकाच्या 95 टक्के खडक येथे आढळतात. या खडकांच्या येथे टेकड्या झाल्या आहेत. येथे खडकांखाली घर करून राहण्यासाठी माणसं धडपडत आहेत.

उन्हाळ्याच्या दिवसात येथील तापमान 40 अंश सेलिअंशपेक्षा अधिक असते. या उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी येथील स्थानिक नागरिकांनी जमिनीच्या खाली घर बनविण्याचा निर्णय घेतला. पाहता पाहता सुमारे चार हजार नागरिकांनी या जमिनीखाली घरे बांधली. आता याठिकाणी संपूर्ण शहरचं वसलं आहे.

या शहरात जमिनीखाली आपल्याला हॅाटेल, कॅसिनो, पुल, विविध खेळ आदी सुविधा उपलब्ध आहेत. यामुळे येथील नागरिक खूप आनंदी आहेत. येथे जमिनीखाली एक संग्रहालय आहे. हे संग्रहालय या शहराचं प्रमुख आकर्षण आहे.

Leave a Comment