पुण्याच्या महापौरपदी भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांची निवड


पुणे – महाराष्ट्रातील महत्त्वाच्या महानगर पालिकांमध्ये आज महापौर पदासाठी निवडणूक पार पडली आहे. पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे महापौर म्हणून निवडून आले आहेत. मुरलीधर मोहोळ यांना या महापौरपदाच्या निवडणूकीमध्ये प्रकाश कदम यांचे आव्हान होते. पण ते चांगल्या मतांच्या फरकाने निवडून आले आहेत.

भाजप आणि शिवसेनेमध्ये महाराष्ट्रात सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तणावग्रस्त संबंध आहेत. पुण्याच्या महापौर निवडीवर त्याचा परिणाम झाला. भाजपने पुण्यात 166 पैकी 99 नगरसेवकांचा पाठिंबा भाजपला मिळाला. आरपीआयच्या 5 नगरसेवकांनी देखील भाजपला पाठिंबा दिला. दरम्यान पुण्यातील शिवसेनेच्या नगरसेवकांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराला मतदान केले. तर मनसे तटस्थ होती. पुणे महानगर पालिकेमध्ये 166 नगरसेवक आहेत. त्यापैकी 99 भाजप, 5 आरपीआय पण त्यांनी भाजपच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवली आहे. तर एनसीपी 41, कॉंग्रेस 9, शिवसेना 10 आणि मनसेचे 2 नगरसेवक आहेत.

Leave a Comment