गोमांस खाणारे लोक जागतिक तापमानवाढीसाठी जबाबदार : रामदेव बाबा


नवी दिल्ली – योगगुरु रामदेव बाबा यांनी जागतिक तापमानवाढीसाठी गोमांस खाणारे लोक जबाबदार असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यांनी गोहत्याबंदीचा कायदा आणावा अशीही मागणी देखील उडपी येथे पार पडलेल्या संत संगम कार्यक्रमामध्ये बोलताना केली.

या संदर्भातील वृत्त द हिंदूने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार गोमांस खाणारे लोक जागतिक तापमानवाढीसाठी जबाबदार असल्याचे रामदेव बाबा म्हणाले आहेत. देशामध्ये गोहत्येविरोधात कायदा करायला हवा असेही रामदेव यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे. देशातील जवळजवळ ९९ टक्के मुस्लीम हे धर्मांतर केलेले असून गोहत्येवर बाबर, अकबर आणि औरंगजेब यांच्या काळातही बंदी होती. गोहत्या थांबवा. इतर कोणते प्राणी तुम्हाला खायचेत ते खा. पण गोमांस खाऊ नका, असे बाबा रामदेव आपल्या भाषणामध्ये म्हटले आहे.

देशामध्ये गोहत्या बंदी आणावी, समान नागरी कायदा लागू करावा आणि देशातील लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशा मागण्या पेजावर मठाचे विश्वेशा तीर्थ स्वामींच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या संत संगम कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व सभासदांनी केल्या आहेत. आपल्या भाषणामधून समान नागरी कायदा लागू करण्याची मागणी देखील रामदेव बाबांनी केली. देशात हा कायदा लागू करण्यासाठी मोहिम राबवली पाहिजे असे रामदेव यांनी म्हटले आहे.

Leave a Comment